
कोल्हापूर: श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या नावे असणारी मौजे मोरेवाडी येथील आठ एकर जमीन परस्पर विकण्यात आली.धनंजय साळोखे या इसमाने जमिनीचा देवस्थान इनाम वर्ग रद्द करण्यासाठी महसूलमंत्री सुरेश धस यांच्याकडे अर्ज केला.त्याप्रमाणे कार्यवाही झाली.त्यात भाजपा सत्तेवर आल्यावर हा आदेश रद्द केला.पुन्हा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी तोच आदेश जारी केला.आणि महसूल यंत्रणेतील संगनमतामुळे जमिनीची विक्री सुरु झाली.हे समजताच याचा पाठपुरावा प्रजासत्ताक संस्थेने केला.शासन दरबारी याचा आवाज उठवला.पण शासनाला जाग आली नाही.या जमिनीची पुन्हा पुन्हा विक्री करण्यात आली.म्हणून शासनाकडून याबाबत उचित कार्यवाही होत नाही असे लक्ष्यात आल्यानंतर प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी वकील सुर्यकांत चौगुले यांच्यामार्फत करवीर विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले.सुनावणीत कागदपत्रे सादर करण्यात आली.सदरचे अपील ११ जुलै रोजी मंजूर करण्यात आले.आणि त्या मिळकतीस पुन्हा श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे नाव लावण्यात आले.तरी महसूल खात्यातील भ्रष्ट कर्मचारी,अधिकारी आणि नेते यांची कसून चौकशी व्हावी अशी मागणी प्रजासत्ताक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.यावेळी उपाध्यक्ष सुशील कोरडे,सचिव बुऱ्हान नायकवडी उपस्थित होते.
Leave a Reply