
कोल्हापूर: दिपक थोरात यांच्याकडून चालविल्या जाणाऱ्या कोल्हापूर आणि उंब्रज येथील इडली अँड कामतस फील द साउथर्न टच या रेस्टॉरंटच्या नावातून कामत हे नाव वगळण्यास सांगण्यात आले आहे.हा आदेश मुंबई येथील उच्च न्यायालयाने दिला आहे.कामत हे नाव विठ्ठल कामतस यांच्या नावाचे ट्रेड मार्क आहे.हे नाव बेकायदेशीरपणे वापरल्याने कामत यांचे फमिली रेस्टॉरंट अच्छा है,सच्चा है या नावाची व्यापारी अप्रतिष्ठा झाल्याचे स्पष्ट होते.पण न्यायालयाच्या या आदेशामुळे आम्हाला आनंद होत आहे.पर्यटन क्षेत्रात आदराने घेत असलेल्या कामत या हॉटेल्सचा दर्जा आम्हाला कायम राखता येईल.कामत म्हणजे गरमागरम,रुचकर आणि आरोग्यदायी शाकाहारी पदार्थ असे समीकरण बनले आहे. त्यामुळे कामतचे गुडविल खूप मोठे आहे.याचा गैरवापर होऊ नये यासाठी न्यायालयाने जो निकाल दिला याबाबत आम्ही समाधानी आहोत असे विक्रम कामत यांनी सांगितले.
Leave a Reply