
कोल्हापूर:गेले सहा महिने प्लास्टिकचा तांदूळ या संकल्पनेने भारतात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.हा तांदूळ चायनीज आहे असाही प्रचार झाला पण असा कोणत्याही प्रकारचा तांदूळ अस्तित्वात नाही असे कोल्हापूर राईस मिल असोसिएशनच्यावतीने आज पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.प्लास्टिक सध्या १२५ रु किलो आहे.यापासून तांदूळ बनविला जरी गेला तरी २०० रु प्रती किलो खर्च येईल.तो ३० रु किलोने विकणे शक्य नाही.तसेच तांदूळ या घटकात ८० टक्के स्टार्च असते.तो शिजवल्यावर स्टार्चच्या नैसिर्गिक गुणाप्रमाने तो चिकटतो.आणि जर त्याचा गोळा बनविला तर त्यातील हवेमुळे तो उसळी घेतो.तसेच प्लास्टिक तांदूळ शिजवल्यास प्लास्टिक वितळते.त्यामुळे असा तांदूळ अस्तित्वात नाही हा फक्त अपप्रचार आहे.अशी माहिती कोल्हापूर राईस मिल असोसिएशनचे अध्यक्ष कुबेर भिवटे यांनी दिली.अश्या अफवांचा नाहक त्रास व्यापारी आणि राईस मिल ओनर्सला होत आहे. त्यामुळे नागरिकांनी यावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला सदानंद कोरगावकर,अमर क्षीरसागर,किशोर तांदळे पुरुषोत्तम बियाणी अनिल झंवर आणि अरविंद जैन आदी उपस्थित होते.
Leave a Reply