
मुंबई : कोल्हापूर- मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी जीव्हीके कंपनी व एअर डेक्कन यांनी सकारात्मकता दाखविली असून, या सेवेसाठी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) कार्यान्वय परवाना (ऑपरेटिंग लायसन्स) पुन्हा मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हा परवाना मिळाल्यानंतर ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे महसूल मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले.
कोल्हापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात आज मंत्रालयात चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी हवाई वाहतुकीसाठी आवश्यक परवाना पुन्हा मिळविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, जीव्हीके कंपनीचे रविन पिंटो, एअर डेक्कनचे जिगर थाळेश्वर, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक वासुदेवन, बालन यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर विमानतळावरून मुंबईसाठी हवाई सेवा सुरू करण्यासंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा झाली. ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जीव्हीके कंपनी व एअर डेक्कन यांनी योग्य ती कार्यवाही करावे, अशा सूचना दादांनी यावेळी दिल्या.
हवाई वाहतुकीसाठीचे ऑपरेटिंग लायसन्स मिळविण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Leave a Reply