बालकलाकार आर्यन मेघजीची ‘कुलस्वामिनी’ मालिकेत एंट्री

 

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘कुलस्वामिनी’ या मालिकेत नव्या व्यक्तिरेखेची नुकतीच एंट्री झालीआहे. बालकलाकार आर्यन मेघजी या मालिकेत ‘मयूर’ची भूमिका साकारत आहे. मयूरच्या एंट्रीनंमालिकेच्या कथानकाला काय ट्विस्ट मिळतो, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ‘कुलस्वामिनी’ मालिकेत आरोही देवधर कुटुंबात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिच्या या प्रयत्नांनाकुटुंबातूनच विरोध होत आहे. सुवर्णा, साक्षी आणि श्रेया आरोहीच्या प्रयत्नांना खिळ घालतआहेत. त्या तिला काही ना काही कारस्थानं करून त्रासही देत आहेत. या पार्श्वभूमीवर, छोटा ‘मयूर’ या कुटुंबात दाखल होतो आणि आरोहीच्या बाजूने उभा राहतो.

 

अनेक जाहिराती आणि मालिकांमध्ये चमकलेला आर्यन मेघजी हा बालकलाकार आरोहीच्यामानलेल्या भावाची भूमिका साकारत आहे. आर्यननं आजवरच्या कामातून उत्तम अभिनयाचा ठसाउमटवला आहे. आता तो आरोहीच्या भावाची भूमिका किती प्रभावी करतो, त्याच्या एंट्रीनंमालिकेचं कथानक कोणतं वेगळं वळण घेणार, हे पहाणं उत्सुकतेचं ठरेल. ८ वर्षीय आर्यनच्याएंत्रीमुळे कुलस्वामीनी सेटवरचे वातावरण अधिक खेळकर झालं आहे. छोट्या आर्यनच्याअभिनयासाठी आणि दमदार कथानक असलेल्या या मालिकेत पुढे काय घडणार, हे जाणूनघेण्यासाठी पहा ‘कुलस्वामिनी’ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!