
कोल्हापूर: भाजप आमदार पाशा पटेल यांनी महाराष्ट्र 1चे पत्रकार विष्णू बुर्गे यांना केलेल्या शिवीगाळच्या निषेधार्थ राज्य भरातून पत्रकरांनी निवेदने, निदर्शने करून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.आज कोल्हापुरातही कोल्हापूर प्रेस क्लब च्या वतीने दसरा चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. सर्व प्रसार माध्यमांच्या पत्रकार,छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.सर्वत्र या घटनेचा निषेध होत असल्याने त्यांना अटकही झाली. लोकशाहीचा चौथा खांब असणाऱ्या प्रसारमाध्यमातील एका पत्रकाराला लातूर येथे पत्रकार परिषद सुरु असताना प्रश्न विचारायला बंदी घातली जाते आणि शिवीगाळ करून अपशब्द वापरून त्याचा अपमान केला जातो हे निंदनीय आहे.या स्थितीत पत्रकार संरक्षण कायदा झालाच पाहिजे अशी मागणीही प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आली.सध्या स्थितीती घडलेल्या घटनेबाबत पोलिसांत गुन्हा दाखल आहे.तसेच पत्रकाराला वापरलेले अपशब्द आणि केलेली शिवीगाळ हा व्हिडिओ देखील सर्वांनी पाहिला आहे. तरी शासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी असे मत महाराष्ट्र 1चे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी व्यक्त केले. यावेळी पाशा पटेल हाय हाय,पाशा पटेल यांचा धिक्कार असो अश्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे यासाठी सरकारने यात लक्ष घालावे अशी मागणी प्रेस क्लब अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी केली. यावेळी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष तानाजी पोवार,सह सचिव पांडुरंग दळवी,संचालक शीतल धनवडे,शुभांगी तावरे,शिवाजी साळोखे,कृष्णात चौगले यासहअक्षय थोरवत, समीर मुजावर,ज्ञानेश्वर साळोखे,रणजित माजगावकर,विजय केसरकर,प्रताप नाईक,राहुल खाडे, श्रद्धा जोगळेकर,बाळासाहेब उबाळे,गौरव डोंगरे,गणेश शिंदे ,सचिन कौलकर, प्रकाश कांबळे,पागडे यांच्यासह सर्व प्रसार माध्यमातील पत्रकार,छायाचित्रकार आणि कॅमेरामन उपस्थित होते.
Leave a Reply