
कोल्हापूर:रेसिडेन्सी क्लबच्या पारदर्शकता वाढविण्यासाठी प्रोग्रेसिव्ह ग्रुप सतत प्रयत्नशील आहे आणि असणार त्यामुळेच निवडणूक रिंगणात उतरलो आहे अशी माहिती ऋतुराज इंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.दर ३ वर्षांनी येणाऱ्या या निवडणुकीत १५ जागांसाठी लढत होत आहे.क्लबच्या एकूण १८१३ सभासदातून ही निवड होणार आहे.येत्या ८ आक्टोंबर रोजी मतदान होणार आहे.या अनुशांगाने आज पॅनेलची भूमिका स्पष्टपणे मांडण्यात आली.यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे १८९८ मध्ये स्थापन झालेल्या या क्लबला २०१५ साली आयएससो ९००० मानांकन मिळाले आहे.हाच दर्जा आणि गुणवत्ता पुढेही राखण्यासाठी प्रोग्रेसिव्ह पॅनेल सतत कटिबद्ध राहील असेही इंगळे यांनी सांगितले.
आजपर्यंत सभासदांच्या हितासाठीच कोडेड एन्ट्री यंत्रणा,देशातील ४३ क्लबबरोबर संलग्नता,९ नवीन राहण्यासाठी रूम्स,अद्ययावत जीम यासह रिडिंग क्लब,स्पोर्ट्स काम्पेन,सभासद आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम,आऊटडोअर स्पोर्ट्स ची गरज लक्ष्यात घेऊन रेसिडेन्सी प्रेस्टीन हा प्रकल्प लवकरच राबविण्यात येणार आहे.
पॅनेलमधील १५ जागांमध्ये सेक्रेटरी अमर गांधी,जॉईन सेक्रेटरी शीतल भोसले,खजानीस बसवराज खोबरे,पंडित बावडेकर,विद्यमान पदाधिकारी आणि संचालक यासह घाटगे उद्योग समूहाचे सतीश घाटगे,सचिन झंवर समीर काळे,डॉ.दिपक अंबर्डेकर आणि महालक्ष्मी बँकेचे माजी अध्यक्ष केदार हसबनीस असे जुने आणि नवे चेहरे यांनाही संधी देणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले.क्लबचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून निवडणूक अधिकारी म्हणून अशोक पाटील काम पहाणार आहेत.पत्रकार परिषदेला सदस्य राजू धनवडे,मानसिंग जाधव,विक्रांत कदम,नरेश चंद्वाणी,मनोज वाधवाणी,बाजीराव नाईक यांच्यासह सभासद उपस्थित होते.
Leave a Reply