ठाणेकरांनी मंदिर प्रवेश केल्यास पुजारी हटाव संघर्ष समितीतर्फे सर्जिकल स्ट्राईक

 

पुजारी अजित ठाणेकर आणि बाबुराव ठाणेकर यांनी नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाईची पूजा केल्यास अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीतर्फे सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना विरोध करू असा इशारा अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने पत्रकार बैठक घेऊन दिला. नवरात्रौत्सव शांततेत पार पडावा यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आश्वासनाला प्रतिसाद देऊन अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीने पुजारी हटावचे आपले आंदोलन स्थिगीत ठेवले आहे. मात्र पुजारी अजित ठाणेकर आणि बाबुराव ठाणेकर यांनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव काळात आपल्याला पूजा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही मंदिरात जाणारच असं आव्हान एकप्रकारे अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीला दिलं आहे. याला अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीन आज पत्रकार बैठक घेऊन विरोध केला. याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणेकरांना कोणत्याही परिस्थितीत अंबाबाई मंदिरात प्रवेश करू दिला जाणार नाही असं सांगितले. अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीचे संजय पवार यांनी याच पुजाऱ्यांच्या कार्यकाळात चार महिन्यांपूर्वी याच ठाणेकरांनी श्री अंबाबाईस साडी चोळी या पारंपरिक पोषाखाऐवजी एक दिवस घागरा चोली पोशाख केला. त्यामुळे भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. याबाबत ठाणेकरांवर गुन्हाही नोंद झाला आहे. मात्र आता नवरात्र उत्सवात मंदिरात प्रवेश करून पूजा करण्याचं आव्हान अपूर्व भक्तांना दिलं आहे. त्यांनी दिलेल्या या आव्हानाला आम्ही प्रतिकार करू त्यांनी मंदिरात प्रवेश केल्यास अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समिती मंदिरात सर्जिकल स्ट्राईक करून त्यांना विरोध करेल इशारा संजय पवार यांनी या पत्रकार बैठकीत दिला . पत्रकार बैठकीस इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, दिलीप पाटील, प्रा जयंत पाटील, माजी आमदार सुरेश साळोखे, आर के पवार, विजय देवणे, राजेश लाटकर, चारुशीला चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!