
कोल्हापूर: कोल्हापूर सर्जिकल सोसायटी आणि डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २३ आणि २४ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय ग्रामीण शल्यचिकित्सक यांची कार्यशाळा डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज येथे होणार आहे.या कार्यशाळेत २०० हून अधिक शल्यचिकित्सक सहभागी होणार असून २३ रोजी नामवंत सर्जन कोल्हापुरातील डी.वाय पाटील हॉस्पिटल येथे २३ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया करून त्याची माहिती सहभागी सर्जन्सना देणार आहेत.अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष डॉ.रवींद्र खोत यांनी पत्रकारांशी बोलतना दिली.या दोन दिवसीय कार्यशाळेत २३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता हॉटेल पर्ल येथे भारतातील तज्ञ डॉ.संतोष अब्राहम यांचे जनरल सर्जन्स समोरील आव्हाने या विषयावर व्याख्यान होणार असून २४ सप्टेंबर रोजी डॉ.के.पी.प्रभू व्याख्यानमाला अंतर्गत विविध तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.२३ तारखेला एकूण १३ शस्त्रक्रिया करत असताना तज्ञ त्यांना मार्गदर्शन करतील.याचे उद्घाटन डॉ.संजय डी.पाटील यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता होणार आहे असे सचिव डॉ.मानसिंगराव घाटगे म्हणाले.पत्रकार परिषदेस सर्जन सोसायटीचे खजानीस विजय कस्सा,डॉ.मानसिंग अडनाईक,डॉ.आनंद कामत यांच्यासह सर्जन उपस्थित होते.
Leave a Reply