
कोल्हापूर: इन्फोसिसचे सह संस्थापक एस.डी.शिबुलाल आणि श्रीमती कुमारी शिबुलाल स्थापित सरोजिनी दामोदर फौंडेशनच्यावतीने १० वी मध्ये ९० टक्के आणि १२ वी मध्ये ८० टक्के तसेच दिव्यांगांसाठी १० आणि १२ वी मध्ये ७५ टक्के गुण मिळवणाऱ्या तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपेक्षा कमी आहे अश्या विद्यार्थ्यांना विद्याधन शिष्यवृत्ती दिली जात आहे.१९९९ साली केरळ राज्यात याची सुरुवात झाली आता महाराष्ट्रातील कोल्हापूर,सांगली,सोलापूर,सातारा आणि पुणे या पाच जिल्ह्यात ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.वार्षिक ६ हजार रुपये आणि पदवी अभ्यासक्रमांसाठी १० हजार आणि ६० हजार रूपांच्या शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहेत.अधिक माहितीसाठी १५ आक्टोंबर पर्यंत www.vidyadhan.org.यावर लॉग इन करून अर्ज भरावा.पात्र विद्यार्थ्यांना सांगली येथे परीक्षा द्यावी लागेल त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती त्यांच्या भविष्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल अशी माहिती भुवनेश्वरी शुरपाली यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.आतापर्यंत १५०० विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळालेला आहे तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply