
कोल्हापूर: गेली तीन वर्ष पाठपुरावा केल्यामुळे नवरात्रीच्या मुहूर्तावर कोल्हापूर ते साईनगर म्हणजेच कोल्हापूर ते शिर्डी अशा नवीन रेल्वे मार्गाला नुकतीच मंजुरी मिळालेली आहे. रेल्वे सुरुवातीला आठवड्यातून एकदा म्हणजे बुधवारी धावणार आहे. शुक्रवारी पुणे येथे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील खासदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबरीने झालेल्या बैठकीत कोल्हापूर ते शिर्डी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे साईभक्तांची चांगली सोय झाली असून कोल्हापूरकरांची अनेक वर्षाची मागणी आता पूर्ण झाली आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली
खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे ही रेल्वे सुरू झालेली आहे .दर बुधवारी सायंकाळी 4:35 वाजता हि रेल्वे कोल्हापूर स्थानकावरून प्रस्थान करेल आणि शिर्डी येथे गुरुवारी पहाटे5.55 वाजता आगमन होणार आहे. तसेच परत येण्यासाठी दर गुरुवारी सकाळी 8.25 वाजता गाडीचे कोल्हापूर कडे प्रस्थान होईल आणि कोल्हापुरात ही रेल्वे 9.25 वाजता येईल. या प्रवासात मिरज सांगली, सातारा,पुणे, दौंड, अहमदनगर हे प्रमुख रेल्वेचे थांबे असतील. या रेल्वेला 6 जनरल डबे,7 स्लीपर कोच, वातानुकूलित थ्री टायरचे 2 डबे आणि द्वितीय श्रेणीतील वातानुकूलित 1 डबा असे एकूण 18 डबे असतील.येत्या 27 तारखेला बुधवारी सायंकाळी 4 वाजता विशेष कार्यक्रम आयोजित करून या गाडीचा शुभारंभ होणार आहे. तसेच ही रेल्वे नियमित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असेही खासदार महाडिक यांनी सांगितले. या बैठकीत कोल्हापूर वैभववाडी या रेल्वेच्या कामाबद्दलही चर्चा झाली असून सहा महिन्यात या रेल्वेमार्गाचे काम आहे सुरू होणार आहे तसेच कोल्हापूर स्थानक मार्च 2018 पर्यंत वायफाय होणार आहे. स्टेशनवर लिफ्ट , एक्सलेटर यांची सोया डिसेंबर महिन्यापूर्वी करण्यात येणार आहे. मार्केट यार्ड येथील स्टेशनच्या समस्या सोडवण्यात आल्या आहेत आणि गांधी नगर स्टेशन येथील प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम दृष्टिक्षेपात आहे असेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर स्थानकाला म्हणजेच छत्रपती शाहू टर्मिनस 125 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर ते शिर्डी नवीन रेल्वे मार्ग मंजुरी आणि कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्ग कामाची सुरुवात यामुळे कोल्हापूर पर्यटनाच्या दृष्टीने केंद्रबिंदू बनेल असेही खासदार महाडिक यांनी सांगितले.
Leave a Reply