कोल्हापूर: महिला वर्गात स्तन कर्करोगाविषयी वाढते प्रमाण यामुळे जनजागृती करून वेळीच उपचार पद्धती सुरू करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ऑक्टोबर महिना हा स्तन कर्करोग जागतिक जनजागृतीचा महीना साजरा केला जातो.म्हणून या महिन्यांत विविध स्तन कर्करोग जनजागृती उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती कर्करोग तज्ञ डॉ. बसवराज कडलगे आणि विश्वास भूमकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारतात स्त्रियांच्या स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. वयाच्या बाविसाव्या वर्षापासून तरुणी आणि महिला यांच्यामध्ये हे प्रमाण अधिक आहे. यासाठी वेळीच निदान होणे गरजेचे असते. स्त्रिया आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे भारतात 22 पैकी एक असे स्तन कर्करोगाचे प्रमाण आढळून येत आहे. ही चिंताजनक बाब आहे असेही डॉ. कडलगे यांनी सांगितले. यासाठीच येत्या ऑक्टोबर महिन्यात विविध महाविद्यालये,ग्रामीण भागात जाऊन याबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. तरी अस्टर आधार येथे आक्टोबर महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी महिलांची मोफत तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी महिलांनी आपली तपासणी वेळीच करून घ्यावी असे आवाहन डॉक्टर बसवराज कडलगे यांनी केले आहे. तसेच 8983445555 या कॅन्सर हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply