
कोल्हापूर: कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र येथील उद्योजकांना जगभरातील औद्योगिक तंत्रज्ञान आणि संशोधनाबद्दल माहिती मिळावी याकरिता येत्या २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि अर्थमुव्हिंग असोशिएशन यांच्या सयुंक्त विद्यमाने इंडस्ट्रीया २०१५ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता शाहूपुरी जिमखाना मैदानावर होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना आणि क्रिएटीव्हिज या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडून या प्रदर्शनाचे उत्कृष्ट व्यवस्थापन होणार आहे.अशी माहिती चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अनंत माने यांनी दिली.
या प्रदर्शनात देश-विदेशातील कंपन्यांचे १५० स्टॉल्स सहभागी होणार असून यात प्रामुख्याने फाँड्री,वस्त्रोद्योग,पॅकेजींग,फायर फायटिंग,सोलर,आयटी,मशीन टूल्स,ऑटोमेशन,टेस्टिंग,मेजारिंग इक्विप्मेंट,मटेरीअल हँडालिंग,सीएनसी,व्हीएमसी,ट्यूब पाईप,बेरिंग,चेन्स यासह अर्थमुव्हिंग क्षेत्रातील २० स्टॉल्स सहभागी होणार आहेत.स्थानिक उद्योगांमध्ये मॅकनेट,जाधव इंडस्ट्रीज,किर्लोस्कर,महिंद्रा,खतेंद्र,गोदरेज,आदित्य पेरीफेलर्स,सिमेन्स,बॉश,जिंदाल या कंपन्या सहभागी होणार आहेत,महाराष्ट्र,कर्नाटक,गोवा,मध्य प्रदेश,आंध्र प्रदेश,गुजरात,दिल्ली आणि तामिळनाडू आदि राज्यातील उद्योजक या प्रदर्शनास भेट देणार आहेत.मागीलवर्षी प्रमाणे यावर्षीही चार दिवसीय या प्रदर्शनास ७० ते ७५ हजारपेक्षाही जास्त लोक भेट देतील असा अंदाज आहे.त्याचप्रमाणे इंजिनिअरिंगच्या विद्यर्थ्यांसाठी तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.जगभरात मंदी असली तरी या प्रदर्शनामुळे आपला उद्योग वृद्धिंगत करणे,उत्पादीत मालाला नवी बाजारपेठ मिळणे सोपे होणे तसेच जगभरातील औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी कोल्हापुरात येत असल्याने उद्योजकांना मंदीमधे संधी मिळणार असल्याचे अर्थमुव्हिंग असोशिएशनचे अध्यक्ष भैय्या घोरपडे यांनी सांगितले.कोल्हापुरात विमानतळ नसल्याचा फटका उद्योगांना बसत आहे.विमानतळ होणे गरजेचे आहे.पण गेल्या १ वर्षापासून उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढत आहे.आणि २0१७ या वर्षापर्यंत भारतीय उद्योगांना आणखी चांगले दिवस येतील असे मत स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी मांडले.तरी या प्रदर्शनाद्वारे स्थानिक उद्योजकाना जगभरातील नामवंत कंपन्यांची उत्पादने आणि नवनवीन संशोधने पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे तरी या प्रदर्शनास जास्तीत जास्त जणांनी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला गोशिमाचे अध्यक्ष अजित आजरी,पंचतारांकित औद्योगिक वसाहत संघटनेचेचे अध्यक्ष संजय जोशी,इंजिनिअरिंग असोशिएशनचे अध्यक्ष प्रकाश चरणे, क्रिएटीव्हिजचे सुजित चव्हाण तसेच मान्यवर उद्योजक उपस्थित होते.
Leave a Reply