कोल्हापूर : डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्याकडे न्युरोसर्जन होण्याकरिता आवश्यक डिग्री त्यांच्याकडे उपलब्ध नाही. त्यांनी हैद्राबाद येथे प्रशिक्षण घेतले पण त्याना डिग्री प्राप्त झालेली नाही, असे असतानाही त्यांनी प्राईम हॉस्पिटल या त्यांच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांवर न्यूरोसर्जन असल्याची बतावणी करून शेकडो चुकीच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्या चुकीच्या शस्त्रक्रिया आणि उपचारामुळे अनेक निष्पाप रुग्णांचा नाहक बळी गेला असून, डॉ. कोस्तुभ वाईकर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आज शिवसेना शहर महिला आघाडीच्यावतीने पोलीस अधीक्षक श्री. संजय मोहिते यांचे कडे केली. तर चुकीच्या उपचाराचे बळी पडलेल्या नातेवाईकांनी भावूक होत आपले गाऱ्हाणे पोलीस अधीक्षकांकडे मांडले.
डॉ. कौस्तुभ वाईकर यांच्या चुकीच्या शस्त्रक्रियेने मृत्यू पावलेल्या तेजस सुनील ठीक या तरुणाच्या वडिलांनी गेल्या आठवड्यात आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार राजन साळवी यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे डॉ कोस्तुभ वाईकर यांच्यावर मनुष्यवधाचा आणि आर्थिक लुबाडणूकीचा गुन्हा दाखल करावा, असा तक्रार अर्ज दिला होत. याचे वृत्त सर्वच दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाले होते. सदर वृत्ताच्या आधारे अन्याय झालेल्या तीन रुग्णांच्या नातेवाइकांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असून, आम्हालाही न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली. त्यानुसार आज शिवसेना शहर महिला आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेऊन तीन रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आणि तक्रार पोलीस अधिक्षकांपर्यंत पोहचविली.
Leave a Reply