बिद्री कारखाना निवडणूकीसाठी ८२ टक्के सरासरी मतदान

 

कोल्हापूर  : बिद्री कारखान्याच्या निवडणूकीसाठी चार तालुक्यातील २२३ गावांमध्ये अत्यंत चुरशिने मतदान झाले. चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या बिद्री कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत ५८ हजार ८५९ मतदारांपैकी ४७ हजार २७७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत उच्चांकी ८०.३२ एवढ्या टक्क्यांनी चुरशीने मतदान केले. एकुण १८४ उत्पादक गटासाठी आणि ३ संस्था गटासाठी अशा १८७ मतदान केंद्रावर किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले. दरम्यान कागल तालुक्यात उच्चांकी ८३.८३ टक्के ऐवढे मतदान झाले. तर भुदरगड तालुक्यात कमी म्हणजे ६९.३१ टक्के मतदान झाले. तसेच करवीर तालुक्यात ८१.१ इतके टक्के मतदान झाले.
तालुका निहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे…
राधानगरी तालुक्यात १८ हजार १६९ पैकी १४ हजार ४२० ऐवढे मतदान झाले. कागलमध्ये १५ हजार २०४ पैकी १२ हजार ७३३ ऐवढे मतदान झाले. भुदरगडमध्ये २० हजार ९५९ पैकी १४ हजार ६११ ऐवढे मतदान झाले. तर करवीरमध्ये ३ हजार ५१२ पैकी २ हजार ८४५ मतदान झाले. तर ‘ब’वर्ग संस्था गटात १ हजार ५० पैकी १ हजार ३१ इतक्या चुरशीने मतदान झाले.
दरम्यान, एकूण ११ मत पत्रिका देण्यात येत होत्या. त्यावर २० शिक्के मारावे लागत होते. त्यामुळे मतदानास वेळ लागत होता. यावेळी प्रत्येक केंद्रावर उमेदवारांची धावपळ, कार्यकर्त्यांची धावाधाव यामुळे गावागावांत राजकीय ईर्ष्येतून मतदानाचा टक्का वाढल्याचे चित्र दिसून आले. आता उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद झाले असून मंगळवार (दि.१०) रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!