
कोल्हापूर : गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक केरळ प्रांतामध्ये निरलसपणे समाज संघटनेचे काम करत आहेत. परंतु तिथे कम्युनिस्ट सरकारच्या संरक्षणाखाली राष्ट्रभक्त स्वयंसेवकांवर अक्षरशः अमानवी पद्धतीने हल्ले आणि त्यांच्या निर्घुण हत्यांचे सत्रच सुरु आहे. पुरोगामीपणाचा आव आणणाऱ्या मार्क्सवाद आणि कम्युनिझमचा हा हिंसक-अमानवी परंतु सत्य चेहरा आहे.जुलै २०१७ मध्ये श्रीकार्याम या ३४ वर्षाच्या कार्यकर्त्याची हत्या झाली. १८ जानेवारी २०१७ रोजी संतोषकुमार या ५२ वर्षाच्या जेष्ठ स्वयंसेवकाच्या झोपडीवर कम्युनिस्ट गुडांनी हल्ला केला आणि असहाय्य संतोषकुमारची धारदार शास्त्रांनी भयानक हत्या केली. त्याचा गुन्हा इतकाच होता की रोज भारतमातेला प्रणाम करणाऱ्या या राष्ट्रभक्त संघाचे तो काम करत होता. त्याच रात्री आणखी एका स्वयंसेवकाला देखील या गुंडांनी मारून अधर्म केले. भाजपा पंचायत समिती अध्यक्ष, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक रवींदन यांच्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या गुंडांनी हल्ला केला होता, त्यांचा दि.१८ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वा मृत्यू झाला. १६ फेब्रुवारी २०१६ रोजी कुन्नूर जिल्ह्यातील पप्पीनीसेरी संघाच्या २७ वर्षीय सुजित या कार्यकर्त्याची त्याच्या घराच्यासमोर मारहाण करून हत्या करण्यात आली. केरळमध्ये या कम्युनिस्टांनी गेल्या वर्षात २८-१२-२०१६, १९-१२-२०१६, १२-१०-२०१६, ७-१०-२०१६, ०३-०९-२०१६, ११-७-२०१६, २२-५-२०१६ रोजी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या हत्या केलेल्या आहेत. या भयंकर कत्तलीमध्ये कम्युनिस्टांनी महिला, लहान मुले, गरीब नागरिक व प्राणी, पक्षी यांनाही लक्ष्य केले आहे ज्यायोगे कार्यकर्त्यांत दहशत निर्माण होईल.
आज संपूर्ण देशभरात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून केरळमधील कम्युनिस्ट सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून भाजयुमो कोल्हापूर जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११ वाजता केरळ सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. केरळ सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर करण्यात आले. “डाव्या विचारी, कॉंग्रेस पार्टीचा धिक्कार असो, केरळ मधील कम्युनिस्ट सरकारचे करायचे काय खाली डोक वर पाय, नाही चेलेगी….नेही चलेगी गुंडशाही नाही चलेगी.. अशा घोषणा देण्यात आल्या.
यानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांसंबंधीचे निवेदन सादर करण्यात आले. केरळमधील डाव्या सरकारचा वरदहस्त असल्यानेचे आतापर्यंत या खुनी गुंडांवर कारवाई होऊ शकलेली नाही. म्हणून पुढील मागण्या करण्यात आल्या.हे डाव्या गुंडांचे दहशतवादी केरळ सरकार बरखास्त करून तेथे आपण राष्ट्रपती राजवट लागू करावी व हे हत्यासत्र थांबवावे.
२) ज्या गुंडांनी या हत्या केल्या आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी.
३) ज्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी.
४) व्यक्तीचे विचार स्वातंत्र्य व व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवावे.यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा संघटन सरचिटणीस बाबा देसाई, सरचिटणीस विजय जाधव, संतोष भिवटे, आर.डी.पाटील, राहुल चिकोडे, नगरसेवक विजय सूर्यवंशी, संतोष गायकवाड, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनिल डाल्या, प्रदेश चिटणीस सुदर्शन पाटस्कर, प्रदेश सदस्य अक्षय मोरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अजय चौगले, दिग्विजय कालेकर, सरदार खाडे, सुमित पारखे, गिरीष साळोखे, सुजय मेंगाणे, विश्वजित पवार, पुष्कर श्रीखंडे, गौरव सातपुते, प्रसाद मोहिते, अतुल चव्हाण, आरती शिंदे, आरती जाधव, प्रियांका दिंडे, वाजीद शिकलगार, गणेश देसाई, सयाजी आळवेकर, अवधूत अपराध, नझीर देसाई, संदीप व्हरांबळे, सिद्धांत भेंडवले, प्रेम काशीद आदींसह युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply