कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागातील डॉ.चंद्रकांत लंगरे यांची इंग्रजी अधिविभागप्रमुख पदी निवड झाली आहे. डॉ.लंगरे हे मुळचे कोल्हापूर जिल्हयातील धरणगुत्ती येथील आहेत. त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इटली येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रात आपले शोधनिबंध सादर केलेले आहेत. अमेरिकेतील मॉडर्न लँग्वेज आसोसिएशन यांनी आयोजित केलेल्या सिएटल, वॉशिंगटन (2012) आणि जॉन्स हॉफकिन्स युनिव्हर्सिटी, बाल्टीमोर मेरीलँड (2017) येथे सबालटर्न लिटरेचर आणि शाम बेनेगल यांच्या चित्रपटांचा भारताच्या राष्ट्रीयत्व बांधणीमधील सहभाग या विषयावर आपले शोधनिबंध सादर केले आहेत. जोसेफ कॉनरैंड सोसायटी इंग्लंड यांनी रोम येथील रोमा त्रे युनिव्हर्सिटी (2013) आणि इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ केंट, कॅटरबरी (2014) येथील चर्चासत्रात जोसेफ कॉनरॅड यांच्या कादंबरीवर आपले शोधनिबंध सादर केले आहेत. तसेच, त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ रिडींग, इंग्लंड येथे अर्ली मॉडर्न स्टडीज असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या आंतराष्ट्रीय परिषदेत इंडियन भक्ती मुव्हमेंट या विशेष सत्रात आपला शोधनिबंध सादर केला असून या सत्राचे अध्यक्षस्थान भूषविले आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये तसेच विद्यापीठ अनुदान मंडळाद्वारे पुरस्कृत उजळणी वर्गामध्ये साधन व्यक्ती म्हणून काम केले आहे. डॉ.लंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आता पर्यंत एकूण सात विद्यार्थ्यांनी पीएच.डी.पदवी संपादन केली आहे. त्यांच्या निवडीमध्ये त्यांना प्रामुख्याने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.देवानंद शिंदे, प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर आणि इंग्रजी अधिविभागातील सर्व सहकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.
Leave a Reply