पुणे ते कोल्हापूर संघर्ष यात्रा कोल्हापुरात

 

कोल्हापूर : कॉ.गोविंदराव पानसरे,डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि प्रा.एम.एम.कलबुर्गी यांचे खुनी व त्यामागील सूत्रधार त्वरित पकडण्यात यावेत,तपास प्रक्रियेत कोणताही राजकीय हस्तक्षेप आम्ही चालवून घेणार नाही.जातीवादी,धर्मवादी संस्था,सनातन संस्था,आरएसएस या संस्थांचा निषेध करत आज पुणे ते कोल्हापूर संघर्ष यात्रा कोल्हापुरात दाखल झाली.कॉ.पानसरे यांच्या घराजवळ त्यांची हत्या झाली त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन पानसरे यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे चालवू अशी शपथ प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांनी सर्वांना दिली.त्यानंतर ही संघर्ष यात्रा दसरा चौक येथे संपन्न झाली.उमाताई पानसरे,स्मिता पानसरे,मेघा पानसरे तसेच सर्व पानसरे कुटुंबीयांनी यात सहभाग घेतला.अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला यापुढे आम्ही सहन करणार नाही,लोकशाहीच्या मार्गाने तत्वाने आम्ही लढत राहू,स्त्रिया.दलित,व अल्प संख्यांक यांच्यावर होणाऱ्या हिंसेचा आम्ही प्रतिकार करू.शहीद दाभोलकर,पानसरे,प्रा.कलबुर्गी अमर रहे अशा घोषणा देत संघर्ष यात्रेची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!