
कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन अध्यक्ष पदासाठीची निवड आज दुपारी तीन वाजता पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कृष्णात पाटील यांची निवड झाली आहे. या पदासाठी जनसुराज्य पक्षाने दावा केला होता. मात्र रविवार जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे व आ. हसन मुश्रीफ यांची शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक झाली. या बैठकी नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या नावावर शिक्का मोर्तब झाला. आणि त्याची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. कृष्णात पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांचा आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Leave a Reply