
कोल्हापूर: रोटरी मिडटाऊनच्या वतीने येत्या २९ आक्टोंबर रोजी रविवारी संध्याकाळी ५ वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे ‘अपूर्व मेघदूत’ या अंध मुलांनी साकारलेल्या नाटकाचा प्रयोग होणार आहे.यात १९ अंध मुलांचा सहभाग आहे अशी माहिती अध्यक्ष रोटेरियन अनिरुद्ध तगारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.या नाटकाच्या प्रयोगातून जो निधी संकलित होणार आहे त्याचा विनियोग जिल्ह्यातील १० शाळांमध्ये M.H.M हा उपक्रम राबविण्यासाठी करण्यात येणार आहे.या उपक्रमांतर्गत माध्यमिक शाळेतील मुलींचे प्रमाण त्यांच्या शारीरिक बदलामुळे घटते.यासाठी त्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व सांगणे आणि शाळांमध्ये सनीटरी नपकीन व्हेंडिंग मशीन आणि नपकीनचे विघटन करणारे पर्यावरणपूरक मशीन रोटरीच्या माध्यमातून बसविण्यात येणार आहे.अशी माहिती रोटेरियन सौ.उत्कर्षा पाटील यांनी दिली.
अपूर्व मेघदूत या नाटकाचे दिग्दर्शन स्वागत थोरात यांनी केले असून निर्मिती सौ.रश्मी पांढरे यांची आहे.महान कवी संत कालिदास यांच्या काव्याचा मराठी अनुवाद म्हणजे हे नाटक असून कोणताही अविष्कार सादर करण्यासाठी देहबोलीबरोबरच डोळे हे महत्वाची भूमिका पार पडतात पण यातील सहभागी कलाकार अंध असले तरी नाटक पाहताना याची जाणीव कुठेही होत नाही म्हणूनच या नाटकाच्या प्रयोगामुळे आपण या मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करू शकतो.पत्रकार परिषदेला सचिव अनिकेत अष्टेकर,विवेक भावसार,अरुंधती महाडिक,श्रीकांत जोशी,केतन मेहता,मोहन जाधव,सचिन लाड सुबोध गद्रे,उदय कुलकर्णी यांच्यसह पदाधिकारी आणि संचालक उपस्थित होते.
Leave a Reply