
कोल्हापूर: जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर म्हणजेच जेएसटीएआरसीच्या वतीने ५ वी तायक्वांदो स्पारिंग स्पर्धा आज कोल्हापूरात राजारामपुरी येथील संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटीच्या हॉल मध्ये पार पडली.कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र येथून १०० हून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी कोल्हापुरातील जेएसटीएआरसीच्या शाखेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.यामध्ये
शुभम भनवलकर,चिन्मय चव्हाण,ऋतुराज माने,शिवराज शिंदे,अमेय चव्हाण,रोहन पिसाळ,यज्ञा प्रधान,श्रेयश स्वामी,गौरव पाटील,जयवर्धन शर्मा,कोमल गुंदेशा,जान्हवी माने,रेणू चव्हाण,श्रीशा गाताडे,गार्गी कणसे आणि विधी गुंदेशा यांनी सुवर्ण पदक पटकावले.
सिद्धांत कर्नावत,मानस चौगुले,प्रीत सोळंकी,सोहम नागदेव,ध्येया वसा,रुद्र गाताडे,अरीन कुलकर्णी,नील भोसले,श्रेयश पाटील,देविका गुळवणी,हिना शेख,यश्वी वसा,आशा कांबळे,अश्नी कुलकर्णी आणि सानवी पटेल या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक पटकावले.
प्रशांत कागवाडे,पार्थ गोगटे,सुमित जगदाळे,प्रतिक सावंत,पृथ्वीराज अवघडे,ओम कुलकर्णी,रुशल पवार,स्वप्नाली देशमाने,अनिश शेटे,वेदांत देसाई,अधिराज मुटगेकर, जिगीषा सबनीस,अक्षदा सावंत,राजलक्ष्मी अवघडे,रुही शाह,माही किटवाडकर,मधुरा शर्मा आणि अनन्या चौगुले यांनी कास्यपदक मिळविले.
परीक्षक म्हणून अमोल पालेकर,अक्षय खेटमार,सिद्धार्थ लाडे,प्रशांत शेंडे आणि सुरज राजपूत यांनी काम पहिले तर प्रशिक्षक रोहिदास शिर्के,ऋषिकेश इटगी यांनी काम पहिले. स्पर्धेचे उद्घाटन जेएसटीएआरसीचे संस्थापक निलेश जालनावाला,विश्वस्थ अशोक जालनावाला, श्रीमती वंदना जालनावाला,सौ. अनुराधा जालनावाला,बेंगलोरचे हेड मास्टर जयकुमार,गुजरातचे हेड मास्टर परेश पटेल,नवीन दवे,वेदांत तायक्वांदो अकादमीचे प्रमुख रोहिदास शिर्के,बी न्यूजचे पत्रकार अमोल माळी,अर्थो स्पेशालिस्ट डॉ.दिपक जोशी,मायक्रोबायलॉजीस्ट डॉ.विजय कुलकर्णी,उद्योगपती रोहित वसा,इंदरलाल चौधरी,प्रकाश भोसले आणि लता भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यानंतर स्पर्धांना सुरुवात झाली.समारोपाच्या प्रसंगी जेएसटीएआरसीचे संस्थापक निलेश जालनावाला यांनी विद्यार्थी आणि पालक यांना तायक्वांदोबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले.संपूर्ण स्पर्धा जेएसटीएआरसीचे कोल्हापूर शाखेचे प्रमुख अमोल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.सूत्रसंचालन स्वप्नील पन्हाळकर यांनी केले.
Leave a Reply