
कोल्हापूर : सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार नुकतीच महापालिका प्रशासनाने रस्त्यावरील वाहतूकीस अडथळा होत असलेली धार्मिक स्थळे काढून टाकावीत. त्यानुसार महापालिकेने अशा दोनशेच्या आसपास धार्मिक स्थळे यांची यादी जाहीर केली. यात जास्तीत जास्त मंदिरांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालायच्या आदेशाचा आम्ही आदर करतो. पण पुरातन व जुनी वर्षानुवर्षे असणाऱ्या या मंदिरात लोकांच्या भावना अडकलेल्या आहेत. तरी सर्व मंदिरांच्या कागद पत्रांची तपासणी करून सर्व धार्मिक स्थळे नियमित करावी अशी मागणी आज सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने करण्यात आली. अडथळा आणणाऱ्या अनेक बेकायदेशीर इमारती, पार्किंगस् आहेत. त्याकडे प्रशासनाने आधी लक्ष्य द्यावे.लोकांच्या भावना दुखावतील अशी कृत्ये करू नये असे मत शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी व्यक्त केले.भाजप जिल्हा प्रमुख महेश जाधव म्हणाले यादी जाहीर करताना जो सर्वे केला त्या समितीचे नाव आम्हाला समजावे .त्याचप्रमाणे कोणताही निर्णय घेताना जनमत घ्यावे यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत.कचरा टाकू नये म्हणून मुद्दामुन जर मंदिरे उभा केली असतील तर ती जरूर हटावावित असे भाजप जिल्हा चिटनीस अशोक देसाई यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दिपक मगदूम, महेश इंगवले यांच्यासह सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply