मराठी टेलिव्हिजनवर सर्वांत भव्य पौराणिक मालिका ‘विठूमाऊली’ 30ऑक्टोबरपासून स्टार प्रवाहवर

 

मराठी टेलिव्हिजनवर येत असलेल्या ‘विठूमाऊली’ यामालिकेविषयी अवघ्या महाराष्ट्रात प्रचंड उत्सुकता निर्माणझाली आहे. विठ्ठलाच्या अगाध महिम्याला साजेशा भव्यदिव्यसोहळ्यात आणि भारावलेल्या वातावरणात थेट पंढरपूरमध्ये’विठूमाऊली’ अवतरली. स्टार प्रवाहची नवी मालिका’विठूमाऊली’ या मालिकेला सादर करण्यात आलं. 30ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी 7 वाजता हीमालिका पाहता येणार आहे.सोहळ्यापूर्वी निर्माता महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारेयांनी पंढरपूरच्या मंदिरात जाऊन विठ्ठल – रखुमाईचं दर्शनघेतलं. त्यानंतर मुख्य सोहळ्याचा प्रारंभ झाला. सुरुवातीलाह.भ.प. पुरुषोत्तमबुवा पाटील यांचं सुश्राव्य कीर्तन झालं.भावभक्तीनं ओथंबलेल्या या कीर्तनात उपस्थित प्रेक्षक दंगझाले. अध्यात्म आणि वास्तव जगाची सांगड घालणाऱ्या याकीर्तनाला विठूमाऊलीच्या गजरानं भरभरून प्रतिसादहीमिळाला. इतक्यातच प्रेक्षकांना सुखद धक्का देत‘विठूमाऊली’ रंगमंचावर अवतरली. उपस्थितांनीविठूमाऊलीचं ते देखणं रूप डोळ्यात साठवून घेताचविठूमाऊली अंतर्धानही पावली. मात्र, विठूदर्शनानं वातावरणभारावून गेलं होतं.
आजवर स्टार प्रवाहनं कायमच आशयसंपन्न मालिका सादरकेल्या आहेत. ‘विठूमाऊली’ या मालिकेच्या रूपानं स्टारप्रवाह अजून एक पाऊल पुढे टाकत आहे. लोकोद्धारासाठीझालेला विठ्ठल अवतार, भक्तांना माहीत नसलेली विठ्ठलाचीकहाणी या मालिकेतून सादर केली जाणार आहे. विठ्ठल,रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यातलं नातंही ही मालिकाउलगडणार आहे. तसंच विठ्ठलाच्या अवतारानं ही जगाचीमाऊली कशी झाली, या अवतारामुळे लोकोद्धार कसा झालाहेही पाहता येणार आहे. विठूमाऊली या मालिकेच्या रूपानंएक भव्यदिव्य कथानक प्रेक्षकांसमोर येणार आहे. विठ्ठलाचामहिमा जितका भव्य आहे, तशीच ही मालिकाही भव्यदिव्यअसणार आहे. या मालिकेसाठी खास कॉस्च्युम आणिज्वेलरी डिझायनिंग करण्यात आलं आहे. उच्च दर्जाच्याकम्प्युटर ग्राफिक्सची जोडही या मालिकेला मिळालीअसल्यानं कथानकातली भव्यता प्रत्यक्ष अनुभवता येणारआहे.महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या कोठारेव्हिजननं या मालिकेची निर्मिती केली आहे. स्टार प्रवाहनंआतापर्यंत आपल्या मालिकांतून अनेक नव्या चेहऱ्यांना संधीदिली. विठूमाऊली या मालिकेतही आपल्याला अनेक नवेचेहरे पहायला मिळणार आहेत. या मालिकेत विठ्ठलाच्याभूमिकेत अजिंक्य राऊत, रुक्मिणीच्या भूमिकेत एकतालबडे, सत्यभामाच्या भूमिकेत बागेश्री निंबाळकर आणिराधाच्या भूमिकेत पूजा कातुर्डे हे कलाकार दिसणार आहेत.त्याशिवाय इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये अनुभवीकलाकारही आहेत. मालिकेची पटकथा संतोष अयाचितआणि पराग कुलकर्णी यांची आहे, तर अजिंक्य ठाकूर संवादलेखन करत आहेत. या कथानकाची भव्यता रुपेश पाटीलचित्रीत करत आहेत. तर अविनाश वाघमारे मालिकेचेदिग्दर्शक आहेत. मालिका सुरू होण्यापूर्वीच याच्या शीर्षकगीताविषयी मोठी चर्चा आहे. आपल्या पहाडी आवाजातआदर्श शिंदे यांनी हे शीर्षक गीत गायलं आहे. गुलराज सिंगयांनी हे गीत संगीतबद्ध केलं आहे. गुलराज यांनी यापूर्वी ए.आर. रेहमान, शंकर-एहसान-लॉय अशा अनेक दिग्गजांसहसंगीत निर्मिती केली आहे. अक्षयराजे शिंदे यांनी हे गीतलिहिलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!