शाहू समाधीस्थळी मेघडंबरीची महापौरांकडून पाहणी

 

कोल्हापूर :- कोल्हापूर महापालिकेच्यावतीने सी वॉर्ड सि.स.नं.2948 नर्सरी बाग येथे राजर्षी शाहू महाराज यांचे समाधीस्थळ विकसीत करण्यात येत आहे. समाधीच्या फायबरमधील मेघडंबरीची प्रतिकृती आज नर्सरी बाग येथील राजर्षी शाहू महाराज यांचे समाधीस्थळी बसविण्यात आली. या प्रतिकृतीची पाहणी आज महापौर सौ.हसिना फरास यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यासमवेत केली. यावेळी महापौर सौ.हसिना फरास यांनी ब्रॉन्झमध्ये कास्टींग केलेल्या मेघडंबरीचे काम येत्या महिन्याभरात पुर्ण करण्याच्या सुचना शिल्पकार किशोर पुरेकर यांना दिल्या. समाधीस्थळ व मेघडंबरीसाठी 1 कोटी 3 लाखाची तरतूद महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. सदरची मेघडंबरी ब्रॉन्झमध्ये अंदाजे 2.5 टनाचे असणार आहे.
यावेळी उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती डॉ.संदीप नेजदार, प्रभाग समिती सभापती अफजल पिरजादे, गटनेता सुनिल पाटील, नगरसेवक अशोक जाधव, शेखर कुसाळे, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता एस.के.माने, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, वास्तुशिल्पी अभिजीत जाधव,  ठेकेदार व्ही.के.पाटील, माजी नगरसेवक आदील फरास, परिक्षित पन्हाळकर, दिलीप देसाई कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!