टॅली6.2 मुळे जीएसटी प्रणाली बनली सोपी

 

कोल्हापूर: केंद्र शासनाने 2017- 18 या आर्थिक वर्षामध्ये जीएसटी प्रणाली सर्व व्यावसायिकांसाठी आणली.त्यांचा व्यवसायातील व्यवहार सोप्या पद्धतीने करण्यासाठी ही प्रणाली आणली. पण सर्व व्यावसायिकांमध्ये जीएसटी बद्दल प्रचंड संभ्रमावस्था होती. संगणक व सुयोग्य सॉफ्टवेअर असल्याशिवाय जीएसटी आमलात आणणे फारच जिकीरीचे होते. परंतु याबाबतीत टॅलीसारखी कंपनी फार आधीपासून सावध होती. सरकार व टॅक्स भरणारे यांच्यातील दुवा म्हणून काम करत होती. त्यांच्या रिलीज 5 पासूनच टॅलीने जीएसटीसाठी आधीच प्लॅटफॉर्म तयार करून ठेवला होता म्हणजे दोन वर्षे आधीपासूनच त्या टॅली जीएसटी साठी तयार होते. साहजिकच त्यातून बिलिंग व अकाउन्टीन विनासायास सुरू झाले. टॅलीचे कोल्हापुरातील अधिकृत 5 स्टार पार्टनर आणि डीलर इंस्टाकॉम येथे टॅलीचे जीएसटी रिटन भरणे,बिलिंग या अवघड प्रणालीला सोपे करण्यासाठी 6. 2 या आता नव्याने आलेल्या व्हर्जनचा वापर व्यावसायिकांनी कसा करावा यासाठी इंस्टाकॉमने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जीएसटी इरा यामुळे एक नवीन स्वच्छ व पारदर्शक दुनिया टेलिव्हिजनच्या साथीने व्यापारी व उद्योजक यांना पाहायला मिळणार आहे. त्यासाठी उद्या १ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशी माहीती इंस्टाकॉमचे हेड संजीव शिवापूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. केंद्र सरकारने जीएसटी प्रणाली राबवल्यानंतर टॅलीमुळे बिलिंग व अकाउंटिंग तसेच जीएसटी रिटर्न भरणे अगदी सोपे झाले आहे. यामुळे काळा पैसा आळा तसेच बील न देणे अशा ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार थांबले गेले आहेत. असेही शिवापूरकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!