
श्री करवीर निवासिनी आंबाबाई मंदीर किरणोत्सवमध्ये येणाऱ्या अडथळ्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना करण्याकरता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने खगोल अभ्यासक पर्यावरणवादी कार्यकर्ते महापालिकेचे अधिकारी यांची एक किरणोत्सव समिती गठीत केलेली आहे या समितीने पूर्वी केलेल्या पाहणीनुसार काही इमारती किरणोत्सवास अडथळा ठरत आहेत.असा अभिप्राय दिला आहे. तसेच या समितीने किरणोत्सव मार्गातील महापालीकेच्या हद्दीत नो डेव्हलपमेंट झोन करण्याचे प्रस्तावित केले आहे.परंतु या समितीने अभ्यासातील सुचवलेल्या बहुतेक इमारती या नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या म्हणजेच प्रभाग क्रमांक ४८ या हद्दीत येत आहेत. या महापालिकेच्या प्रभागातील किरणोत्सवामध्ये अडथळा येणाऱ्या इमारतींचा व मोठ्या क्षेत्रांचा समावेश अजित ठाणेकर नगरसेवक असलेल्या भागात होतो तरी या समितीने या प्रभागाचे नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी अथवा ननागरिकांना विश्वासात न घेताच सर्व अभ्यास केल्याचे दिसते. सदर समितीमध्ये बाधित होणाऱ्या मोठ्या भागाचा प्रतिनिधी म्हणून नगरसेवक अजित ठाणेकर यांचा लोकप्रतिनिधी म्हणून समावेश करण्यात यावा असे निवेदन आज ठाणेकर यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना देऊन तशी मागणी केली आहे.
Leave a Reply