
कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये बेरोजगार महिलांसाठी व अपंगासाठी ई-रिक्षा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणीव ठेवून शिवसेना कोल्हापूर शहरच्या वतीने हा प्रकल्प सुरु करणेत येणार आहे. कोल्हापूरमध्ये सध्या ज्या रिक्षा सुरु आहेत त्यांचे अस्तित्व अबाधित ठेवून, त्यांच्या व्यावसायिक उत्पनावर कोणताही आघात न करता हा ई-रिक्षाचा प्रकल्प सुरु करणेत येणार आहे. या ई-रिक्षासाठी लागणारे मार्जिन मनी अंदाजे दहा टक्के आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन दि. २४ नोव्हेंबर रोजी पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी, पेट्रोल-डिझेलचा वापर टाळण्यासाठी आणि शहरवासियांना सुरक्षित प्रवास मिळवून देण्यासाठी वीजेवर चालणाऱ्या ई-रिक्षा आता कोल्हापूर शहरात सुरुवात होणार आहेत. कोल्हापुरात ई-रिक्षाच्या केंद्राची सुरुवात होणार असून, ई-रिक्षा चार्जिंग सेंटर आणि ई-रिक्षा ट्रेनिंग सेंटर दि.२४ नोव्हेबर रोजी सुरु होणार आहे. कोल्हापूर शहर सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहे. यामध्ये सर्वाधिक प्रदूषण हे रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होत असल्याने ई-रिक्षा येणाऱ्या काळामध्ये प्रदूषण रोखण्यास मदत करणार आहेत. ई-रिक्षा यंत्रणेच्या प्रणालीची अमंलबजावणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागानेही परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात शहरातील ई-रिक्षा रस्त्यावर सुसाटपणे धावणार आहेत. या ई-रिक्षाना देशभरातील काही मोठ्या शहरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. ही रिक्षा केवळ ३ युनिट इलेक्ट्रीसिटी चार्जिंगवर म्हणजेच २० ते २५ रुपयात जवळपास १०० किलोमीटर ही रिक्षा चालणार आहे. या रिक्षामुळे प्रदुषणाला मोठा आळा बसणार आहे, शिवायडीझेल-पेट्रोलला एक पर्याय उभा राहणार आहे. कोल्हापूर शहरासाठी ई-रिक्षाची गरज आहे. कारण; शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे दिवसेंदिवस वाहन खरेदी करण्याचा आलेख वाढला आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. ई-रिक्षा बॅटरीवर चालणाऱ्या असतील. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाला आळा बसेल. १८ वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती ई-रिक्षाद्वारे व्यवसाय करु शकते. शिवायत्यांना ट्रेनिंग देण्यासाठी कोल्हापुरात सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. या रिक्षामुळे सर्वसामान्यांना होणारा त्रासही काम होणार आहे, व्यवसाय सुरु करून बेरोजगार महिला व अपंगाना रोजगार मिळणार आहे.
कोल्हापूर शहरातील बेरोजगार महिला व अपंगांना या प्रकल्पामध्ये सहभाग घ्यायचा आहे, अशांनी उद्या दि. ०१ नोव्हेंबर ते दि. ०५ नोव्हेंबर पर्यंत शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर येथे संपर्क साधून मागणी अर्ज करावेत. ई- रिक्षाचे ट्रेनिंग कंपनीच्यावतीने दि. १० नोव्हेंबर पासून सुरु करण्यात येणार असून, या नंतर आर.टी.ओ कडून ई- रिक्षा लायसन्स व सर्व कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थीना कोणत्याही प्रकारचे पैसे भरावे लागणार नाहीत, असा हा प्रकल्प आहे. अशा इच्छुकांनी त्वरित शिवसेना शहर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
Leave a Reply