
कोल्हापूर :वय अवघे १८ वर्षे गत हंगामात शिवनेरी फुटबॉल संघाचा प्रमुख खेळाडू असलेल्या मुबीन सिकंदर जमादार या तरूण खेळाडूस बोन मॅरो ट्रान्सप्लांट या दुर्धर आजाराने ग्रासले. आर्थिक परीस्थित बेताची वडील गल्लोगल्ली लिंबू विकून संसाराचा गाडा रेटत असताना तरूण मुलास झालेल्या आजारावर असणारा लाखो रुपयांचा खर्च करायचा कसा या विवंचनेत असताना, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून मुबीन बागवान याच्यावरील उपचाराकरिता एकूण रु. १५ लाख खर्चापैकी रु. ७ लाखांची आर्थिक मदत आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून झाली आहे. आर्थिक मदत मंजुरीचे पत्र आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ येथे मुबीन सिकंदर बागवान यास देण्यात आले. यासह मुबीन बागवान याच्या पुढील सर्व उपचाराची जबाबदारी आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने घेण्यात येईल, अशी ग्वाहीहि आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
कोल्हापूर शहरातील भोई गल्ली, बिंदू चौक परिसरात राहणारा मुबीन सिकंदर बागवान हा युवा फुटबॉल खेळाडू आहे. त्याच्या अंगामध्ये रक्ताचे प्रमाण आणि पेशींची संख्या कमी असल्याने त्याच्यावर श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल, सांगली येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया/ उपचार करण्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी निश्चित केले. परंतु, यास सुमारे १५ लाख रुपये खर्च, त्याचबरोबर औषधोपचारासाठी महिन्याचा सात हजार खर्च भागवायचा कसा या द्विधा मनस्थितीत बागवान कुटुंबीय होते. त्याचवेळी मुबीन बागवान याचे काका शकील बागवान यांनी मुस्लीम बोर्डिंगचे श्री. गणी आजरेकर यांच्याशी संपर्क साधला. श्री. गणी आजरेकर यांनी तातडीने आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. मग बागवान कुटुंबीयांनी आमदार राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन त्याना परिस्थिती सांगितली. यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी तातडीने आवश्यक कागदपत्रे तयार करून घेऊन आर्थिक निधी मदतीचा अर्ज मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, टाटा मेमोरियल ट्रस्ट, श्री सिद्धिविनायक गणपती ट्रस्ट प्रभादेवी आदी ५२ ट्रस्टकडे सादर केला. त्यासाठी वारंवार पाठपुरावा करून मुबीन बागवान यास मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून रुपये तीन लाख आणि टाटा मेमोरियल ट्रस्ट, मुंबई मधून रुपये चार लाख आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी बोलतना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, मुबीन बागवान हा उमधा खेळाडू असून, एखाद्या खेळाडू समोर अशी परिस्थिती निर्माण होणे आणि त्यातून पुन्हा उभारी घेणे हे त्याच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असते. भारताचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग यानेदेखील कॅन्सर विकारावर मात करून पुनरागमन केले. मुबीन बागवान याला देखील हेच आव्हान समोर असून, या परिस्थितीवर मात करून पुन्हा एकदा फुटबॉलचे मैदान गाजविण्यास सज्ज होईल. त्याच्या पुढील सर्व उपचाराच्या खर्चाची जबाबदारी फौंडेशनने घेतली असून, नक्कीच लवकरच कोल्हापूर वासीय मुबीन बागवान याला मैदानात खेळताना पाहतील असा विश्वास व्यक्त करीत अशा दुर्धर विकारसह मेंदू, हृदय, किडनी आदी विकाराने ग्रस्त शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांनी शिवसेना शहर कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन, आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
यावेळी मुस्लीम बोर्डिंगचे श्री. गणी आजरेकर, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, ऋतुराज क्षीरसागर, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, नासीर सय्यद, लियाकतभाई मुजावर, जहांगीर अत्तार, शकील बागवान, शिवसेनेचे खुद्बुद्दिन बेपारी, जयवंत हारुगले, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, युवा सेना शहरप्रमुख अविनाश कामते, अनिल पाटील, गजानन भुर्के, सुशील भांदिगरे, ओंकार तोडकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply