
कोल्हापूर: आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे उपआयुक्त मंगेश शिंदे व कर निर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे यांनी शनिवारी घरफाळा विभागाकडील कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये घरफाळा विभागाच्या वसुली बाबत घरफाळा विभागाकडील कर्मचाऱ्यांना निर्देश दिले होते. आज गांधी मैदान ए/बी वॉर्ड घरफाळा विभागाने 8 मिळकत धारकांना नोटीसा बजावल्या आहेत. यापुर्वी टिंबर मार्केट येथील प्लॉट नं.15 मुसाहुसेन शेख यांची 5 लाखाची थकबाकी असलेने त्यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांची सुनावणी घेवून त्यांना रक्कम भरणेबाबत मुदत दिली होती. परंतु मुदतीत रक्कम त्यांनी न भरलेने त्यांची मिळकत आज तात्पुर्ती सिल करण्यात आली आहे.
सदरची कारवाई सहाय्यक अधिक्षक विशाल सुगते, कनिष्ठ लिपीक सुभाष ढोबळे, श्रीकांत चव्हाण, मुरलीधर बारापात्रे, कर्मचारी विक्रम पोवार, चंदू पाटील, सुरेखा कुंभार, शशिकांत खाडे, प्रताप माने, आदींनी सदरची कार्यवाही पुर्ण केली आहे.
Leave a Reply