
कोल्हापूर: कोल्हापूरला उद्योगांची विशेष पार्श्वभूमी आहे. उद्यमनगरी असो वा चप्पल कींवा कोल्हापुरी साज कोल्हापूर जिल्हा उद्योगधंद्यात कायमच प्रगत राहिला आहे. या उद्यमशीलतेला नवी दिशा देण्यासाठी कोल्हापूर चे नाव उद्योगजगतात अजून उंचावण्यासाठी पुणे येथील दे आसरा फाउंडेशन कोल्हापूर मध्ये कार्यरत होत आहे. नवीन उद्योजकांना व्यवसाय उभा करण्यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे यासाठी पर्सिस्टंट सिस्टीम या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीचे संस्थापक व कार्यकारी अधिकारी आनंद देशपांडे यांनी 2020 पर्यंत एक लाख रोजगार आणि 25000 उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून दे आसरा फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. आत्तापर्यंत पुण्यामध्ये 2000 हून अधिक उद्योजकांना या संस्थेने व्यवसाय उभा करण्यासाठी व तो वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले आहे . इथून पुढे महाराष्ट्रातील बहुतांश भागात व्यावसायिकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी ही संस्था काम करणार आहे. तसेच कोल्हापूर मधील उद्योजकांना शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवसायाचे मार्गदर्शन व उद्योजकांना बँकामार्फत भांडवल उभारणी करण्यास मदत करण्याच्या दृष्टीने ही संस्था कोल्हापुरात काम सुरू करत आहे अशी घोषणा आज पत्रकार परिषदेत करण्यात आली. या उद्योजकांना व्यवसाय मार्गदर्शन हवे आहे त्यांनी 020- 65 36 53 00 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही यावेळी सांगण्यात आले. दे आसरा फाउंडेशन नवीन व्यवसायाचे नियोजन आणि तो या स्पर्धेच्या युगात वाढवण्यासाठी कायमच व्यावसायिकांच्या पाठीशी उभी राहते तसेच विविध बँका शैक्षणिक शासकीय संस्था आणि उद्योगजगतातील तज्ञ व सल्लागार यांच्या मदतीने मदत करते. भांडवल व्यवसाय सुरू करताना आवश्यक असते त्यासाठी लागणारे कर्ज कोल्हापूर मधील बँकांकडून मिळवण्याची सोय या संस्थेच्यावतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी अनेक बँकांची बोलणे यासाठी तयार आहेत. तरी उद्योजक व नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांनी मूलभूत ज्ञान व व्यवसायासाठी तसेच त्याचा विस्तार करण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करण्यास ही संस्था मदत करणार आहे. या संस्थेबद्दल अधिक माहितीसाठी www deasara. in या वेबसाईटवर लॉग इन करावे यामध्ये वव्यवसायात संबंधीचे मार्गदर्शन तो चालू करण्याची प्रक्रिया तसेच विस्तार करण्याचे नियोजन करण्यात आले असून व्यावसायीकांनाआपल्या व्यवसायाबद्दल स्पष्ट कल्पना व कोणत्या गोष्टींवर काम करणे गरजेचे आहे हे पुर्णपणे लक्षात येते.
Leave a Reply