
कोल्हापूर: सर्वसामान्य लोकांना, निराधारांना आधार या पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या संकल्पानुसार सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकिय क्षेत्रामध्ये उतुंग कार्य सुरु आहे. श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ कोल्हापूर येथील सिद्धगिरी हॉस्पिटल ॲंड रिसर्च सेंटर व धर्मादाय आयुक्त कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिपुरारी पौर्णिमानिमित्ताने पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली सिद्धगिरी हॉस्पिटल रिसर्च सेंटर, कणेरी, कोल्हापूर, दिनांक ४ नोव्हेंबर २०१७ रोजी आयोजित केलेल्या मार्गदर्शन व उपचार मोफत आरोग्य तपासणी शिबिरास तालुकाभरातुन भरघोस प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींनी धन्वंतरी पूजन व दिप प्रज्वलाने केले. यावेळी मठाचे प्रशासकीय श्री आर. डी. शिंदे सर ,सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रवीण नाईक , डॉ. प्रकाश भरमगौडर , डॉ. जितेंद्रसिंग राजपूत यांनीही दिपप्रज्वलन केले.
रूग्णसेवा हिच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य असणाऱ्या सिद्धगिरी हॉस्पिटलतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. त्यातीलच एक भाग म्हणून हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. मेंदूरोग चिकित्साअंतर्गत डॉ. शिवशंकर मरजक्के व डॉ. निषाद साठे, स्त्रीरोग चिकित्सक डॉ. जितेंद्रसिंग राजपूत, सामान्य शव्य चिकित्सक डॉ. स्वप्निल जाधव यांनी तसेच मोतीबिंदू तपासणी अंतर्गत श्री विरेंद्र वणकुंद्रे यांनी सुमारे २०० रुग्नांची तपासणी केली. या शिबिरातील लाभार्थीना सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया व तपासणी उपलब्ध करून देणार आहेत. हे शिबिर यशस्वी होण्याकरिता डॉ. प्रमोद घाटगे, एच. आर. प्रिती चोरडे , कौतुक बंके , कृष्णा वाळके यांचे विशेष सहकार्य लाभले. भविष्यात आमचे अनेक रुग्नोपयोगी आयोजित करण्याचा संकल्प वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रविण नाईक यांनी व्यक्त केला. या आरोग्य शिबिरामुळे नागरीकांना मोफत तपासणी, औषध व काही शिबिरार्थीना उपचार लाभला. या शिबिरासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी लक्षणीय होती.
Leave a Reply