
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज राजभवन, मुंबई येथे बेल्जियमचे किंग फिलिप्पे आणि क्वीन माथिल्दे यांची भेट घेतली. बेल्जियम किंग यांच्या समवेत वरिष्ठ मंत्री व व्यवसाय प्रतिनिधीमंडळ होते. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव सुमित मल्लिक, आदी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना किंग फिलिप्पे म्हणाले, हीरा व्यापार क्षेत्रात इंडो-बेल्जियम चांगली वणिज्यिक कामगिरी होत आहे. बेल्जियम निर्यातीचे प्रमाण 80 टक्क्यांहून अधिक प्रमाणावर वाढले अहे. दोन्ही देशातील व्यापार वाढविण्यासठी तसेच गुंतवणुकीचा विस्तार वाढवून बेल्जियम व भारत यांच्यातील आर्थिक संबंध आणखी मजबूत करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले.राज्यातील स्वच्छ ऊर्जा, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, उच्च शिक्षण, कौशल्य विकास आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्र आणि बेल्जियम यांच्यातील सहकार्य वाढावे, अशी अपेक्षा राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.
Leave a Reply