
कोल्हापूर : सांगली जिल्हयातील किर्लोस्करवाडी येथे आम्ही छोटासा उद्योग सुरू केला होता तो आता वाढीला लागला आहे याची दखल कोल्हापूरच्या राजांनी घेतली होती.यावरूनच त्यांनी कोल्हापूरमध्ये उद्योग क्षेत्राला चालना दिली होती. आता यामध्ये आम्ही गुंतवणूक केली असून आमचा उध्दार झाला आहे तसाच उध्दार होण्यासाठी उद्योजकांनी उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करणे गरजेचे आहे तरच उद्धार हा होणार आहे असे मत किर्लोस्कर ब‘दर्स लि.चे चेअरमन संजय किर्लोस्कर यांनी व्यक्त केले.कोल्हापूरमध्ये मेन इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन कोल्हापूर इन्व्हेस्ट इन कोल्हापूर हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील शाहूपूरी जिमखाना मैदान येथे हे प्रदर्शन 18 ते 21 नोव्हेंबर 2017 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना किर्लोस्कर यांनी कोल्हापूर मध्ये विविध क्षेत्रात प्रगती होत चालली आहे. विविध उद्योग याठिकाणी येत आहेत. कोल्हापूर बरोबर सांगली,इचलकरंजी आदि ठिकाणी नवनवीन उद्योग आहे मात्र ते वाढण्यासाठी गुंतवणूक महत्वाची आहे.असे सांगितले.तर ऋषीकुमार बागला यांनी सीआयआय ज्याज्या ठिकाणी कंपनी शाखा आहेत त्या ठिकाणी जीएसटी,पॉलीसीवर काम करीत असल्याचे सांगितले.तर सीआयआयचे चेअरमन योगेश कुलकर्णी यांनी प्रदर्शनाचा हेतू सांगून नवीन कंपन्या कोल्हापूरमध्ये गुंतवणूक करीत आहेत त्यांच्यासाठी खास करून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.कोल्हापूरमधील उद्योगजकांनी व्यापार कशा पध्दतीने करावा तो कसा होवू शकतो यावर अधिक भर देणे आवश्यक असल्याचेही सांगितले.फौंड्री,शुगर कंपनी, याचबरोबर अॅटोमोबाईल कंपनी आहेत त्यांनी अधिक उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगितले.
बाबाभाई वसा यांनी कोल्हापूरमध्ये उद्योग क्षेत्राविषयी आणि इचलकरंजी डेअरी, व शुगर ,अमूल आदी कंपन्या भरीव कामगिरी करीत आहेत.याचा उपयोग उद्योगक‘ांतीसाठी करून घेणे आवश्यक आहे.असे सांगितले.याठिकाणचा फौंड्री उद्योग किती पुढे आहे याविषयी मार्गदर्शन केले आणि प्रदर्शन चांगले असून उद्योजकांना याचा उपयोग होणार असल्याचे सांगून योगेश कुलकर्णी यांचे विशेष आभार मानले.राजीव गुप्ते यांनी बोलताना आता नव्या पॉलीसी आमच्या एमएसएमई कंपनीच्या मार्फत पुढे येणार आहेत.शासन आता यावर काम करीत असून हे निश्चित प्रोत्साहन मिळणारे असल्याचे सांगितले .
यावेळी बोलताना खा.धनंजय महाडीक यांनी कोल्हापूरच्या उद्योग नगरीतून देश विदेशात उत्पादने निर्यात केली जाते क्षमता आणि दर्जा उत्तम आहे याचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण दलाचा एक प्रकल्प कोल्हापूरात आणण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.शाहू महाराजांनी उद्योग,आणि शिक्षणाचे महत्व त्याकाळी पटवून दिले होते.त्याच संस्कारासह कोल्हापूरचे नाव देश विदेशात पसरले आहे.दरडोई उत्पन्नात कोल्हापूर दुसर्या क‘मांकावर आहे.सरकारच्या कोणत्याही मदतीशिवाय केवळ कर्तबगारीतून उद्योजकांनी उद्योग क्षेत्र वाढविले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 237 कोटी रूपये मंजूर केले आहेत.यासह कोकण रेल्वे कोल्हापूरशी कनेक्ट व्हावी म्हणूनही केंद्राकडे पाठपुरावा करून 3500 कोटी रूपयांचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे.माजी रेल्वेमंत्री सुरेंश प्रभु यांच्याकडे पाठपुरावा करून 1700 कोटी मंजूरही करून घेतले असल्याचे धनंजय महाडीक यांनी सांगितले.
उद्योगक्षेत्राला चांगले दिवस येत आहेत.कुशल तंत्रज्ञ,दर्जात्मक उत्पादन याचा विचार करता कोल्हापूरात संरक्षण विभागाचा एक प्रकल्प उभा राहिल्यास त्याला लागणारे मटेरियल येथील उद्योजक देतील .येत्या हिवाळी अधिवेशनात येथील उद्योजकांनी पथदर्शी प्रकल्पाबाबतचे प्रेझेंटेशन तयार करावे ते देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सितारामन व राज्यमंत्री सुभाष बांबरे यांना सादर करू याकरीता उद्योजकांनी दिल्लीला यावे असेही त्यांनी सांगितले.यावेळी सीआयआयचे मोहन घाटगे यांनी प्रदर्शनास शुभेच्छा दिल्या. या प्रदर्शनाचे सूत्रसंचालन असिफ चरेनिया यांनी केले. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी जाधव इंडस्ट्रिजचे चंद्रकांत जाधव, कोल्हापूर चेंअर ऑफ कॉमर्सचे आनंद माने, स्मॅकचे सुरेंद्र जैन यांची उपस्थिती होती.
प्रदर्शनामध्ये 18 नोव्हेंबर रोजी उद्योग क्षेत्रात भारतात सुरूवातील संधीवाढ या विषयावर राम बेनाडे,प्रशांत पाटील,शफीक अहमद यांनी मार्गदर्शन केले. तर 19 रोजी आदराधित्य पर्यटन क्षेत्रात वाढीची संधी, इलेक्ट्रीक व्हेईकल गतीशीलता संधी आणि पुढे त्याच्यावर विचार विनिमय,भारतीय महिला नेटवर्क, 20 नोव्हेंबर रोजी व्यवसायापासून व्यवसाय-अॅटोमोबाईल मॅन्युफॅक्चरींग ,व्यापार व्यवसाय -संरक्षण उत्पादन 21 नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात कौशल्य विकसित योग्य विचार आदि विषयांवर तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.
प्रदर्शनामध्ये पॅकेजिंग ,सोलर, ,वेव्हींग मशिन,स्टोअरेज सिस्टीम,सेफ्टी इक्वीपमेंट ,कटिंग टुल्स,हायड्रोलिक्स,क‘ेन,बेअरिंग्ज,नट बोल्टस,मटेरियल हॅन्डलिंग,न्यूमॅटिक टुल्स,बँकींग ,ऑईल, चेन्स अॅन्ड पुलिज, टेम्परेचन इंडीकेटर इंडस्ट्रियल एअरकुलर अॅन्ड इव्हा पोटेटिव्ह सीसी सिस्टीम आदी विविध उत्पादने पहावयास मिळणार आहेत.
उद्योग क्षेत्राशी निगडीत असलेल्या या प्रदर्शनामध्ये राज्यातील कोल्हापूरसह देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये फौंड्री इक्वीपमेंट,बॉश,शिकागो न्यूमॅटिक,किर्लोस्कर, हिंडाल्को इंडस्ट्रिज लि.,ग‘ीव्हज पॉवर लि,बीपीको इंडस्ट्रियल टुल्स,इंडो स्पार्क कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस,फारो,त्रिलोकलेझर्स, गगनन्त सोल्युशन्स अॅन्ड सर्व्हिसेस,फ‘ोनियस इंडिया,महिंद्रा,ड्रायमॅटिक इंजिनियरींग,मयुरा स्टील्स,पायोनियर,रेक्झनॉल्ड इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कंट्रोल लि,मॅसीबस ऑटोमेशन अॅन्ड इन्स्ट्रयुमेंटेशन, एसएचके पॉलीमर्स इंडस्ट्रिल,केपी मशीन्स,सारस्वत को-ऑप बँक लि,वंडर केमिकल अॅन्ड कोटिंग्ज,युनीमॅक सॉफ्टवेअर प्रा.लि,एअरटेक न्यूमॅटिक,मॅक अॅन्ड टेक थ‘ीडी प्रिंटर्स, जीमको लि,कन्सलन्यूवॅट सर्व्हिसेस,पॉझीट्रॉनिक इब्स्ट्रॉक,शेअर इकॉनॉमी,गुरूदत्त सीएनसी,सीडबी आशा दीडशेहून अधिक कंपन्या त्यांची उत्पादने यांचे स्टॉल्स याठिकाणी आहेत. या प्रदर्शनाचे व्यवस्थापन हे कि‘एटीव्हज एक्झीबिशन अॅन्ड इव्हेंट व हाऊस ऑफ इव्हेन्ट या संस्थेने केले आहे
यावेळी व्यासपीठावर खा.धनंजय महाडीक, रॉकेट इंजिनियरिंग असोसिएशनचे मॅनेजिंग डायरेक्टर बाबाभाई वसा, सीआयआयचे साऊथ महाराष्ट्र झोनल कौन्सिलचे माजी चेअरमन मोहन घाटगे,सीआयआयचे साऊथ महाराष्ट्र झोनल कौन्सिलचे अध्यक्ष योगेश कुलकर्णी,गोकुळ शिंरगांव मॅन्युफॅच्युरिगं असोसिएशनचे सुरजिसिंग पवार,कोल्हापर इंजिनियरिंग असोसिएशनचे बाबासाहेब कोंडेकर,कोल्हापूरचे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी,मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन कागल-हातकणंगलचे अध्यक्ष हरिशचंद्र धोत्रे,शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे राजू पाटील,द इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमनचे दिपंकर विश्वास,एमएसएमईडीआयचे राजीव गुप्ते, एमएसएमईडीआयचे अभय दप्तरदार,फौेंड्री इक्विपमेंटचे एमडी रविंद्र चिरपुटकर,कोल्हापूर उद्यम को.ऑफ सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत मुळे,सीआयआयचे वेस्टर्न रिजनचे रिजनल मॅनेजर शौगट मुखर्जी आदी उपस्थित होते.
Leave a Reply