
कोल्हापूर : कोल्हापूरचे लाडके आमदार राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस आज 24 नोव्हेंबर रोजी साजरा करणेत येत असून, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाची पर्वणी साधून शहर शिवसेनेच्या वतीने विविध विभागांनी सांकृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांचे शहरात आयोजन करण्यात आले आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये विविध स्पर्धा पार पडल्या तर येत्या काही दिवसात उर्वरित स्पर्धा पार पडणार आहेत. त्याचबरोबर शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार राजेश क्षीरसागर यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी युवा सेना कोल्हापूर शहर आणि शिवसेना शाखा जोतीबा रोड यांच्यावतीने श्री अंबाबाई देवीला अभिषेक करण्यात येणार आहे. यासह कसबा बावडा विभागाच्यावतीने कसबा बावड्याचे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर येथेही अभिषेक करणेत येणार आहे.
यानंतर सकाळी १०.०० वाजता शिवसेना विभागीय कार्यालय कसबा बावडा येथे आमदार राजेश क्षीरसागर पदाधिकारी आणि शिवसैनिकांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करतील. या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र रिक्षा चालक सेना आयोजित रिक्षा व्यावसायिकांच्या “आमदार चषक” क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस समारंभ यावेळी पार पडणार आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते विजेत्या संघास आमदार चषक आणि रोख १० हजार रुपये, उपविजेत्या संघास उपविजेता चषक व रोख ७ हजार रुपये आणि तृतीय संघास मानचिन्ह आणि रोख ५ हजार रुपये अशी आकर्षक बक्षिसे देणेत येणार आहेत. याशिवाय स्पर्धेतील उत्कुष्ट खेळाडूना वैयक्तिक बक्षिसेही देणेत येणार आहेत.
यानंतर शिवसेना फेरीवाले सेनेच्या वतीने महाद्वार रोड येथे श्री अंबाबाई दर्शनाकरिता येणाऱ्या भाविक आणि नागरिकांना प्रसाद वाटप करणेत येणार आहे. यानंतर युवा सेनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अंध शाळा, मिरजकर तिकटी येथे अंध मुलांकरिता स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सीपीआर अभ्यागत समितीच्या वतीने गोरगरीब रुग्णांना सीपीआर रुग्णालय येथे फळे वाटप करण्यात येणार आहे. यासह राजारामपुरी विभागाच्यावतीने बागल चौक येथे हायमास्ट लम्प च्या पायाभरणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर शहरामध्ये बेरोजगार महिलांसाठी व अपंगासाठी ई- रिक्षा सामाजिक जाणीव ठेवून शिवसेना कोल्हापूर शहरच्या वतीने हा प्रकल्प सुरु करणेत येणार आहे. या ई-रिक्षासाठी लागणारे मार्जिन मनी अंदाजे दहा टक्के आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. सदर ई रिक्षा या आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज रोजी सायंकाळी ७.०० वाजता “शिवालय, शिवसेना शहर कार्यालय, कोल्हापूर” येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना दोन किलोचा चांदीचा धनुष्यबाण शिवसैनिकांकडून भेट देण्यात येणार आहे.
Leave a Reply