
कोल्हापूर :राजेश क्षीरसागर यांच्या सारख्या हक्काच्या आमदारामुळेच कोल्हापूर आज पुढे आहे,कोल्हापूरचा रासरशीत पणा अजूनही जिवंत आहे असे उदगार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये काढले.आज कोल्हापूर शहरामध्ये बेरोजगार महिलांसाठी व अपंगासाठी ई-रिक्षा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणीव ठेवून शिवसेना कोल्हापूर शहरच्या वतीने हा प्रकल्प सुरु करणेत येणार आहे. या ई-रिक्षासाठी लागणारे मार्जिन मनी अंदाजे दहा टक्के आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. सदर ई रिक्षा या आमदार राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दि. २४ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील २४ लाभार्थ्याना या ई- रिक्षाचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या समाज कार्याचे कौतुक शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांनी केले. यासह कोल्हापूरवासीय सर्वांपुढे नेहमीच दोन पाउल पुढे असल्याचे सांगत, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या भावी कार्यास शुभेछ्या दिल्या. यावेळी महापौर सौ. हसीना फरास, खासदार मा. विनायक राउत, जलसंपदा राज्यमंत्री नामदार मा. विजय शिवतरे, मा. अरुणभाई दुधवडकर, आमदार प्रकाश आबिटकर, मा. संजय मंडलिक, मा. नियाज खान, मा. सौ. वैशाली राजेश क्षीरसागर, मा. सौ. प्रतिज्ञा उत्तुरे – निल्ले, मा. अभिजित चव्हाण, मा. राहुल चव्हाण, मा. महेश उत्तुरे, सुनील मोदी, रविकिरण इंगवले, आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply