चित्रपटापेक्षा मालिका निर्मिती मोठे आव्हान: सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी

 

कोल्हापूर: कोणत्याही चित्रपटापेक्षा मालिका निर्मिती करणे हे मोठे आव्हान असते.मालिका निर्मिती करताना प्रत्येक आठवड्याला एक चित्रपट निर्मिती केल्या समान आहे असे मत सुप्रसिद्ध अभिनेते आणि प्रथमच मालिका निर्मिती करत असलेले निर्माता स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केले. कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. कोल्हापूर निर्मिती साठी चांगले लोकेशन आहे.मला कोल्हापूर नेहमीच आवडते असेही ते म्हणाले. कोल्हापूरचे कथानक घेऊन ‘नकळत सारे घडले’ ही मालिका स्टार प्रवाह वर येत्या 27 नोव्हेंबरपासून सायंकाळी 7.30 वाजता प्रदर्शित होतं आहे.
स्टार प्रवाहनं कायमच नाविन्यपूर्ण कथानक असलेल्यामालिका सादर केल्या आहेत. या मालिकांवर महाराष्ट्रानंभरभरून प्रेम केलं. या मालिकांमध्ये ‘नकळत सारे घडले’ यामालिकेच्या रुपानं महत्त्वपूर्ण भर पडणार आहे. ‘नकळतसारे घडले’ या मालिकेत गोष्ट आहे मुलीची.जी एकाछोट्या मुलीची प्रेमळ, काळजी घेणारी सावत्र आई होते. त्याबरोबरच या मालिकेला काही वेगळे पदरही आहेत.कोल्हापूरात राहणाऱ्या आणि वेगळी सांस्कृतिक पार्श्वभूमीअसलेल्या दोन कुटुंबाची ही गोष्ट आहे. ही आजच्या मॉडर्नकाळातली रंजक गोष्ट आहे.उत्तम कथानक असलेल्या या मालिकेत उत्तम स्टारकास्टहीआहे. हरीश दुधाडे, नुपूर परूळेकर, बाल कलाकार सानवीरत्नालीकर, अनुराधा राजाध्यक्ष, उमेश दामले, सुदेशम्हशीलकर, सुरेखा कुडची, प्राची पिसाट, यांच्या भूमिकाआहेत. अभिजित गुरू यांनी मालिकेची कथा, पटकथालिहिली आहे. अभिजित पेंढारकर संवादलेखन करत आहेत.तर, अवधूत पुरोहित दिग्दर्शन करत आहेत. मालिकेचंटायटल साँग नीलेश उजल या नव्या दमाच्या गीतकाराचंअसून, टायटल साँगचं संगीत नीलेश मोहरीर यांचं आहे.मालिकेविषयी निर्माता स्वप्नील जोशी म्हणाले ‘या मालिकेतनात्यांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहाण्याचा हा एक अप्रतिमप्रयत्न आहे. या मालिकेत नाट्य आहे, भावभावना आहेत,खूप सारे ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. म्हणूनच यामालिकेसाठी मी खूप उत्सुक आहे. स्टार प्रवाहच्या देवयानी,पुढचं पाऊल अशा काही मालिका म्हणजे मराठीटेलिव्हिजनवरचे बेंचमार्क आहेत. निर्माता म्हणून मला खात्रीआहे, की ‘नकळत सारे घडले’ ही आमची मालिका स्टारप्रवाहच्या आजवरच्या लौकिकाला साजेशी ठरेल.’
मालिका सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियामध्ये या मालिकेचेप्रोमो आणि टायटल साँग लोकप्रिय झालं आहे. आताअनोख्या नातेसंबंधाची कहाणी असलेली ‘नकळत सारेघडले’ पहा २७ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवार सायं.७:३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!