एंजेलिक फाऊंडेशनचे हंस महिला फुटबॉल क्लबला इंडियन वुमन लिगच्या पात्रता फेरीसाठी प्रायोजकत्व

 

कोल्हापूर : देशाच्या राजधानीत महिला फुटबॉलला प्रोत्साहन देण्यात एंजेलिक फाऊंडेशनने महत्वाचा वाटा उचलला आहे.आपल्या या प्रयत्नांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न वुमन्स लिग क्वालिफायरच्या दुसर्‍या भागातही केला असून फाऊंडेशनने दिल्लीच्या वुमन्स स्पोर्टस क्लबला त्यांचे या पात्रता फेरीतील ध्येय गाठण्यासाठी प्रायोजकत्व दिले आहे. यावर्षी या स्पर्धा कोल्हापूरमध्ये 25 नोव्हेंबर ते 8डिसेंबर2017 या कालावधीत होत आहेत.एंजेलिक फांऊडेशनच्या या मदतीचा क्लबला खूपच उपयोग झाला आहे नवी दिल्ली आणि हरियाणातील मुलींना व्यावसायिक साधने,स्पोर्टस किट आणि आर्थिकदृष्ट्या मदत मिळाली आहे. यावर्षी या खेळाडूंना महाराष्ट्रात आणण्याच्या खर्चाची जबाबदारीही उचलली आहे.

एंजेलिक फाऊंडेशनच्या सीएसआर विभागप्रमुख जयश्री गोयल यांनी याविषयी बोलताना गेल्या काही वर्षापासून एंजेलिक फाऊंडेशनने मुलींच्या फुटबॉलला पाठिंबा दिला आहे.खेळा हा शारीरीक आणि मानिसकदृष्ट्या आरोग्यपूर्ण राहण्याचा सकारात्मक मार्ग आहे.मुलींना खेळाबरोबरच त्यांचे शैक्षणिक करिअर परिपूर्ण होण्यासाठीही आम्ही प्रयत्न करत राहणार असल्याचे सांगितले आहे. हंस वुमेन्स फुटबॉल क्लब हा दिल्लीमध्ये झालेल्या स्टेट वुमन्स फुटबॉल लीग 2016 च्या विजेता संघ आहे हा  देशव्यापी स्पर्धांमध्ये सहभागी होणारा द्ल्लिीचा पहिला संघ असणार आहे.

इंडियन वुमन्स लीगचा पहिला सीझन यशस्वी केल्यानंतर ज्यामध्ये सहा संघाचा समावेश होता ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने ही लीग अधिक स्पर्धात्मक करण्याचा निर्णय घेतला असून देशातील जास्तीत जास्त संघ यामध्ये उतरविण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून लीगने महिला फुटबॉलला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी नव्या दमाच्या खेळाडूंना स्पर्धात्मक वातावरणात खेळण्याचा महत्वपूर्ण अनुभव देण्याचे व्यासपीठ तयार केले आहे.एंजेलिक फाऊंडेशन ही एंजेलिक इंटरनॅशनल लिमिटेडच्या सीएसआर अंतर्गत सामाजिक पायाभूत सेवा देणारी संस्था आहे. त्याअंतर्गत फाऊंडेशनने भारतातील शिक्षण आणि ग‘ामीण भागाच्या सक्षमीकरणासाठी आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!