सतेज कृषी 2017 या भव्य कृषी व पशु प्रदर्शनाचे आज माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 

कोल्हापूर : शेतकर्‍यांना एकाच छताखाली संपूर्ण माहिती मिळावी व शेतकर्‍यांना शेतीसाठी उपयुक्त असे सतेज कृषी2017 भव्य कृषी व पशु प्रदर्शन हे येत्या 1 ते 4डिसेंबर 2017 या कालावधीत तपोवन मैदान येथ आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून भव्य मंडप याठिकाणी उभे करण्यात आले आहेत.या प्रर्दशनाचा उद्घाटन सोहळा हा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उद्या दुपारी 4 वाजता होणार आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती माजी मंत्री पतंगराव कदम यांची असणारआहे.यावेळी बारा तालुक्यातील 28 शेतकर्‍यांना सतेज कृषी पुरस्क़ार देऊन गौरविण्यात येणारआहे.

शेतकर्‍यांना उपयुक्त असणारे हे प्रदर्शन आ.सतेज पाटील यांनी यावर्षी प्रथमच आयोजित केलेआहे.येथील तपोवन मैदान येथे हे प्रदर्शनचार दिवस भरविण्यात आले असून या प्रदर्शनात देश विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.याचबरोबर पशुपक्षी दालन,शेतकर्‍यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, कंपन्यांची उत्पादने व शेतकर्‍यांसाठी तंत्रज्ञान मशिनरी यांची माहितीएकाच छताखाली मिळणारआहे. या प्रदर्शनामध्येएकूण अडीचशे ते तीनशे स्टॉलचा समावेश आहे तर महिलांच्या बचत गटांना मोफत स्टॉल   या ठिकाणी देण्यात आलेले आहेत.प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग‘ाहक थेट विक‘ी होणारा तांदूळ महोत्सव, 200 पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग, 200 पेक्षा अधिक पशु-पक्षांचासहभाग,शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र,विविध शेती अवजारे, बि-बियाणेखते आदिंची माहिती,फुलांचे प्रदर्शन व विक‘ी (पुष्पप्रदर्शन),विविध सांस्कृतिक कार्यक‘म व बचत गटांचे मोफत स्टॉल,आधुनिक शेतीसाठी प्लॅस्टिकचे महत्व,लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश असणारे हे प्रदर्शन शेतकर्‍यांसाठी उपयुक्त असे असणार आहे.

चार दिवस चालणार्‍या या प्रदर्शनाच्या दुसर्‍या दिवशी 2 डिसेंबर रोजी शेतकर्‍यांसाठी दुधाळ जनावरांचे व्यवस्थापन या विषयावर डॉ.नितीन मार्तंड (परभणी) हे शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत जे परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रा.आहेत.तर तिसर्‍या दिवशी 3 डिसेंबर रोजीआष्टा येथील कृषी भूषण शेतकरी संजीव माने हे एकरी दोनशेहून ऊसाचे उत्पादन या विषयावर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार असून त्यांनी यावर प्रयोगही केलेले आहेत.याचबरोबर ते थेट शेतकर्‍यांशी संपर्क साधून या उत्पादना विषयी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीतअसतात त्यांचे मार्गदर्शन शेतकर्‍यांना या प्रदर्शनामध्ये होणारआहे.

देशातील आघाडीच्या संशोधनपर उपयुक्त्त शेतीसाहित्य निर्माण करणार्‍या रिलायन्स पॉलीमर्स ,महालक्ष्मी शेती विकास केंद्र यांचे या प्रदर्शनास प्रायोजकत्व लाभलेले आहे.तर डी.वाय.पाटील,शेती विभाग महाराष्ट्र राज्य,जिल्हा परिषद,कोल्हापूर,आत्मा यांचे सहकार्य लाभलेआहे.चॅनेल एस न्यूज हे याचे मिडीया पार्टनरअसून स्कायस्टार या इव्हेंट संस्थेचे स्वप्निल सावंत यांनी याचे आयोजन केले आहे.या प्रदर्शनामध्ये विविध नामांकित संस्था व कंपन्या सहभागी होतआहेत.या मध्ये रॉकेट इंजिनियरिंग,विजय इंजिनियरिंग, मिरर फुड इंजिनियर,यांची डेअरी उत्पादनेआहेत.मयुरेश इंडस्ट्रिज,शक्त्तीमान इंडस्ट्रिज,अभिमानग प्लास्टिक बोलो,जयपूर मध्ये सुरू झालेल्या कंपन्यांचा प्रथमच कृषी प्रदर्शनात सहभागयांची सुरूवात कोल्हापूर मधूनच सुरू केली जाणार आहे.,बी.एस.एस.,किर्लोस्कर (के.एम.डब्लू) लॉगलाईफ, श्रीकृपा इंडस्ट्रिज,सिल्व्हरपंप,लक्ष्मीसेल्स अ‍ॅण्ड सर्व्हिसेस,यात्रा फर्टिलायझर्स ,कॅप्टन इरिगेशन,गुजरात,जय इंडस्ट्रिज,डी.वाय.पाटीलग‘ुपपुढे यांच्यासह विविध कंपन्यांचा सहभाग आहे.मशिन पॉवर,ट्रीलर्स,सोलर पंप्स,मिल्कींग मशिन,कडबाकुट्टी,बी.बियाणे, अवजारे, खते,औषधेआदीउत्पादनांसह ट्रॅक्टर्सही या ठिकाणी पहावयास मिळणार आहेत.प्रदर्शनामध्ये पशुपक्षी,जनावरे यांचे ही दालन उभे करण्यात आले असून वेगवेगळी जातीवंत अशी तीनशेहून अधिक जनावरे या ठिकाणी पहावयास मिळणार आहेत.यामध्ये नांदेडहून गलबेल लाल गांधारी आणण्यात येणार आहे,लातूरहून देवणी गाय याचबरोबर जर्शी गायींचा समावेशआहे.डॅनिष गायी येणार आहेत.30 ते 35 दूध देणार्‍या जातीवंत खिलारगाय, वळू,पंढरपूरी म्हैशी,रेडे,मुरारेडे,खडकनाथ कोंबड्या,शिरीराजवनराज, टर्की कोंबड्यांचा समावेश आहे.याचबरोबर गिनीपिक अश्व,मेंढी,शेळ्या,विविध उस्मानाबादी विविध जातीच्या मेंढ्या, ससेपालन,शेतीलापुरक पशुपालनव्यवसाय असल्याने वेगवेगळी जनावरे व त्यातून शेतीपूरक व्यवसाय कसा केला पाहिजे याची माहिती तरूणवर्गाला या पशुपक्षीप्रदर्शनाच्या माध्यमातून होणारआहे.या पशुपक्षी प्रदर्शनातून स्पर्धा आयोजित करून नंबर येणार्‍या जनावराचा गौरव केला जाणारआहे.

प्रदर्शनात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री असणारा तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्येआजरा घनसाळ, इंद्रायणी,एचएमटी, सोना, रत्नागिरी 24,सेंद्रीय गुळ,नाचणी आदींची थेट विक्री याठिकाणी केली जाणार असून ज्याची थेट खरेदी ही सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांना करता येणार आहे आणि तीसंधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.शेतकर्‍यांना शेतीसाठी आवश्यक असणारी माहिती व मार्गदर्शनएकाच छताखाली याठिकाणी मिळणारअसूनचार दिवस चालणार्‍या प्रदर्शनाच्या ठिक़ाणी शेतकर्‍यांनी कोल्हापूरच्या जनतेने आवर्जुन भेट देऊन प्रदर्शन पहावे असे आवाहन संयोजक आ.सतेेज पाटील यांच्यासह स्कायस्टार या संस्थेने केलेआहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!