
कोल्हापूर: तमिळनाडू व्हीवर को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही सोसायटी को ऑपटेक्स म्हणून गेल्या 83 वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत रुजू आहे. मागील चार वर्षापासून ही संस्था कोल्हापूर मध्ये हँडलूमचे प्रदर्शन भरवत आली आहे. कोल्हापूरमध्ये या प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळाल्याने खास कोल्हापूरकरांच्या व ग्राहकांच्या मागणीनुसार यावर्षी दुसऱ्यांदा हे प्रदर्शन 1 ते 7 डिसेंबर दरम्यान हॉटेल रेसिडेंसी येथे भरवण्यात आले आहे अशी माहिती सोसायटीचे रिजनल मॅनेजर प्रकाश नाडणकर आणि शन मुगम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या संस्थेच्या भारतभर दोनशेहून अधिक शाखा असून वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन पॅटन घेऊन यावर्षी हे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रेसिडेन्सी क्लबचे खजिनदार शितल भोसले यांच्या हस्ते करण्यात आज करण्यात आले. नवनवीनडिझाईन व फॅशनमध्ये हे प्रदर्शन आपल्या भेटीला कोल्हापूरमध्ये आले आहे. या ठिकाणी असणाऱ्या नव्या वेगवेगळ्या व्हरायटी ग्राहकांच्या आवडीच्याअसल्याने ग्राहकांना नक्कीच हे प्रदर्शन आवडेल अशी अपेक्षा नाडणकर यांनी व्यक्त केली.कोल्हापुरातील चांगल्या प्रतिसादामुळे हे प्रदर्शन पुन्हा भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात नवीन डिझाइन केलेल्या सॉफ्ट सिल्क,कोरा सिल्क, कांचीपुरम् सिल्क या प्रकारातील साड्या तसेच बेडशीट चादरी, टावेल, पंचे ,कोईमतूर कॉटन साड्या भवानी सतरंज्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच या सर्वांवर सरकारी विशेष अशी 30% सुट्टी देण्यात आली आहे. हे प्रदर्शन सात दिवसाच्या कालावधीत सकाळी 10 ते 8 वाजेपर्यंत ग्राहकांसाठी खुले राहणार आहे. तरी या प्रदर्शनाचा लाभ कोल्हापूरकरांनी घ्यावा असे आवाहन प्रकाश नाडणडकर यांनी केले आहे. तसेच ह्या वेबसाईटवर ऑनलाईन घरी बसून या प्रदर्शनातील वस्तूंची खरेदी करता येणार अाहे. पत्रकार परिषदेला वेट्रीवेल आर. एम यांच्यासह सहकारी उपस्थित होते.
Leave a Reply