
कोल्हापूर – कोल्हापूर महापालिकेतर्फे टाकाळा व राजोपाध्येनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉल आणी बॉक्सिंग कोर्टमुळे शहराच्या वैभवात भर पडेल. तसेच याठिकाणी नक्कीच चांगले खेळाडू तयार होतील असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केले. बॅडमिंटन हॉलच्या उद्घाटनाच्या प्रसंगी ते बोलत होते.
माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते फित कापून आज सकाळी टाकाळा येथील बॅडमिंटन हॉल तसेच सायंकाळी राजोपाध्येनगर येथील बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन करण्यात आले. आमदार पतंगराव कदम, आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार पी.एन. पाटील प्रमुख उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला. शासनाच्या महानगरपालिका क्षेत्रात प्राथमिक सोयी सुविधांच्या विकास कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत सदरचे दोन बॅडमिंटन हॉल बांधले आहेत. प्रास्ताविक विजय वणकुद्रे यांनी तर आभार प्रदर्शन नगरसेवक मुरलीधर जाधव यांनी मानले.
यावेळी आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, उपमहापौर अर्जुन माने, ऋतुराज पाटील, स्थायी समिती सभापती डॉ.संदीप नेजदार, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ.वनिता देठे, सभागृहनेता प्रविण केसरकर, प्रभाग समिती सभापती सौ.छाया पोवार, सौ.प्रतिक्षा पाटील, अफजल पिरजादे, गटनेता शारंगधर देशमुख, सुनिल पाटील, नगरसेवक संजय मोहिते, तौफिक मुल्लाणी, अशोक जाधव, भुपाल शेटे, दिलीप पोवार, राहूल माने, नगरसेविका सौ.उमा बनछोडे, सौ. स्वाती यवलुजे, सौ.अश्विनी रामाणे, सौ.शोभा कवाळे, सौ.जयश्री चव्हाण, दिपा मगदूम, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता आर.के.जाधव, रमेश मस्कर, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे, माजी नगरसेवक राजू पसारे, विजय सुर्यंवशी, राजेश लाटकर, मधुकर रामाणे, वसंतराव देशमुख व भागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply