शेतकर्‍यांचा आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आता निर्णय घेणे आवश्यक -माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण

 
कोल्हापूर : सरकारने सरसकट कर्जमाफी केली पाहिजे शेतकर्‍यांना अडचणीतून बाहेर काढणे आता आवश्यक असून यावर आता मुख्यमंत्री यांनी निर्णय घेणे आवश्यक असल्याचे आज सतेज कृषी 2017 या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले येथील तपोवन मैदान येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून याचे आज माजी मंत्री आ.पतंगराव कदम ,आ.हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये शेतकर्‍यांना एक चांगले मार्गदर्शन होईल असे उपयुक्त कृषी प्रदर्शन आयोजित केले असून दरवर्षी त्यांनी हे प्रदर्शन भरावे अशी अपेक्षा चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.
   व्यासपीठावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याचे पाहून आनंदी वातावरण असल्याचे चव्हाण म्हणाले.जागतिक पातळीवर जे चांगले चालते ते महाराष्ट्रात व भारतात आणता आले पाहिजे.आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करून घेता आला पाहिजे.तंत्रज्ञान बदलत चालले आहे.देशात आता राजकारणाऐवजी पाण्यासाठी भांडणे सुरू झालेली आहेत आणि नेमके पाणी ऊस शेतीलाच अधिक लागते आणि शेतकरी ऊसाची शेती करीत आहे.असे सांगून शेतीच्या उत्पन्नावर जीएसटी लावली जात आहे. ती लावता कामा नये आपण लोकप्रतिनिधी या नात्याने यावर प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.कर्जमाफीचा निर्णय हा चिंतेचा विषय असून सरकारने सरसकट कर्जमाफी करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
  यावेळी बोलताना माजी मंत्री आ.पतंगराव कदम यांनी सतेज पाटील आमचा मानसपुत्र आहे तो कसा निवडून येतो ते आम्हालाही जमत नाही असे सांगून सतेज पाटील हा भाग्यवान असल्याचे सांगितले.कोल्हापूर हा पुरोगामीचा जिल्हा असून रगेल कार्यकर्ते व शाहू महाराजांचा हा जिल्हा आहे.या शहरात कमी पाण्यात जास्तीत जास्त शेती कशी करता येईल याचे शिक्षण मिळणे आवश्यक असून सरकार फसवे असल्याचे सांगितले.शेतीमालाला भाव मिळणे आवश्यक आहे.असे सांगितले.तर आ.हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून एक पर्वणी शेतकर्‍यांना मिळणार आहे.सतेज पाटील सर्वच तालुक्यातील शेतकर्‍यांचा सत्कार हा केला असून ही एक चांगली बाब असल्याचे सांगितले.
   यावेळी भाषणात आ.सतेज पाटील यांनी कर्जमाफी किती केली हा संशोधनाचा विषय आहे.शेतकर्‍यांना एक चांगले व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून दिले असून याचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा असे सांगितले.जमिनीचे भाग पडत चालले असून शेतीसाठी जागा आता कमी पडू लागली आहे.याचा विचार आता होणे गरजेचे झाल्याचे सांगितले.
   आजच्या या उद्घाटन कार्यकर्त्यांमध्ये तानाजी मोरे,मारूती पाटील(करवीर),अरूण पाटील,नारायण जाधव (करवीर)धोंडीराम कतगर,मधुकर तेलवेकर,कलगोंडा पार्वते(कागल),एकनाथ गोनुगडे,तानाजी पाटील(राधानगरी),तानाजी पाटील,पांडूरंग पाटील(गगनबावडा),दादासो पाटील,जिवन बेर्डे (शाहूवाडी),सौ.आनंदी चौगुले,बबन कुंभार(पन्हाळा),कृष्णात धनगर,संतोष शेळके(हातकणंगले),अनिल दिंडे,महावीर देसाई(शिरोळ),काशीनाथ कुरळे,पांडूरंग अरबोळे(गडहिंग्लज),सूर्यकांत दोरूगडे,संभाजी सावंत(आजरा),कृष्णा रेगडे,अरूण वांद्रे(चंदगड),चंद्रकांत चव्हाण,अशोक देसाई(भुदरगड) आदी शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला.
  यावेळी व्यासपीठावर माजी खा.निवेदिता माने, महापौर.सौ.हसीना फरास, उपमहापौर अर्जुन माने,संजय डी.पाटील,के.पी.पाटील,काँगसचे जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील, ए.वाय.पाटील,शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण,सौ.प्रतिमा पाटील,प्रकाश आवाडे,सौ.गायकवाड,यांच्यासह आजी माजी  नगरसेवक यांची उपस्थिती होती.आजच्या पहिल्याच दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकर्‍यांसह लोकांनी गर्दी तपोवन मैदानावर केली होती.यावेळी प्रास्ताविक विनोद पाटील यांनी केले.तर सूत्रसंचालन शुभदा हिरेमठ व महादेव नरके यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!