
कोल्हापूर : कोल्हापुरातील यशो दर्शन सामाजिक विकास मंडळ संचालित अर्पण ब्लड बँक या नामांकित रक्तपेढीला क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने एन.ए.बी.एच मानांकन देऊन गौरवण्यात आले आहे. हे मानांकन प्राप्त करणारी अर्पण ब्लड बँक पुणे वगळता पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच बँक ठरली आहे. गुणवत्ता आणि दर्जातील सातत्य, सेवेतील तत्परता या निकषांची काटेकोर तपासणी केल्यानंतरच हे मानांकन दिले जाते. ही अधिमान्यता मिळवण्यासाठी संस्थांना डोळ्यात तेल घालून कार्य करावे लागते. कागदपत्रांची काटेकोर छाननी, गुणवत्ता नियंत्रण या बाबींची तपशीलवार पडताळणी केल्यानंतरच हे मानांकन मिळते. या मानांकनामुळे अर्पण ब्लड बँकेसह कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अशी माहिती ब्लड बँकेच्या अध्यक्षा सौ.प्रीती चिंचणीकर आणि राजेंद्र चिंचणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर परिसरात विविध ठिकाणी ऐच्छिक रक्तदान शिबीरांचे आयोजन करून जास्तीत जास्त रक्त संकलन करणारी रक्तपेढी असा नावलौकिक अर्पण बँकेने निर्माण केला आहे.गरजू रुग्णांना तत्पर व गुणवत्तापूर्वक रक्तपुरवठा करण्यावर भर दिला आहे. सामाजिक बांधिलकी अर्पण ब्लड बँकेतर्फे थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करण्यात येतो. बँकेच्या या कार्याची दखल घेऊन कोल्हापूर बाळशास्त्री जांभेकर पत्रकार महासंघाच्यावतीने आदर्श पुरस्कार करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला डॉ. प्रकाश गावडे, बी. जी कांबळे डॉ संदीप पाटील, बाबासाहेब आघाव,माधव ढवळीकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते
Leave a Reply