शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आपली प्रगती करावी: खा.राजू शेट्टीं

 

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी शेती उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आपली प्रगती करावी. असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केलें. ते सतेज कृषी प्रदर्शनाच्या समारोपा प्रसंगी बोलत होते. येथील तपोवन मैदान येथे १ ते ४ डिसेंबर या कालावधीत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाचा समारोप खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, आमदार उल्हास पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबीटकर माजी आमदार संपतबापू पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना खासदार राजू शेट्टी यांनी हा कृषी प्रदर्शनाचा पहिलाच प्रयत्न यशस्वी झालाय. शेतकऱ्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला. आता जमिनीचा शेती व्यतिरिक्त इतर कारणासाठी वापर होत आहे. आता तुकड्याची शेती हे आपल्या सामोर आव्हान उभे आहे. भारतातील शेतीची परिस्थिती वेगळे आहे. शेतीसाठी योग्य धोरण अवलंबविण्याची गरज आहे. आमचा शेतकरी जागाच्या शेतकऱ्याची स्पर्धा करू शकत नाही. फक्त तंत्रज्ञानाच्या मागे जाऊन चालणार नाही तर त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे शेतीवर संशोधन केलं पाहिजे असे सांगितले. कृषी खात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे आपला शेतकरी जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकत नाही. जमिनीत विविधता असल्याने सब घोडे 12 टक्के म्हणून शेतीचे धोरण ठरविता येत नाही. शेतीसाठी संशोधन कमी पडत आहे. संशोधन केंद्र मागे पडत आहेत. आता शेतीसाठी डोकं लावावं लागत प्रतिकूल परिस्थितीत शेती शक्य आहे त्यासाठी तंत्रज्ञानाची गरज आहे. कराची आकारणी करतांना जीएसटीमूळे शेती क्षेत्रावर फार मोठा अन्याय झालाय. आता केंद्र सरकार ट्रॅक्टरला व्यवसायिक वाहन बनवत आहे. चारचाकी ट्रॉलीला 28 टक्के जीएसटी आहे. साखर जीवनावश्यक वस्तू आहे. त्यामुळे साखरेच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करतात मग उसाच्या बाबतीत अस करत नाहीत असा प्रश्नही खासदार राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. तसेच शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून प्रगत शेती करावी असं प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी या जिल्हयातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान पोचावे या दृष्टीकोनातून हे प्रदर्शन भरविलय. अनेकांना याचा फायदा झाला. शेतकऱ्यांना संधी उपलब्ध करून दिली. कृषी अवजारांना नावपूरतीच सबसिडी त्यामुळे शेतीला उपक्युक्त असलेल्या अवजारांना जीएसटी वगळावे. शेतकऱ्याला जीएसटीमुक्त करावे यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे त्याचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी आमचा प्रयत्न आहे. यापुढे दरवर्षी हे कृषी प्रदर्शन करू अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली.
यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी आमदार सतेज पाटील यांनी आधुनिक शेती, पशुसंवर्धन शेतकऱ्यांपर्यंत या प्रदर्शनाच्या माध्यमातून पोचवले. तसेच ते महिला सक्षमीकरणा बरोबर आता शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत आहेत. यापुढेही ते शेतीच्या आधुनिक संकल्पना मांडतील. सतेज आणि माझ्यामध्ये मैत्रीचा धागा आहे. विधिमंडळा नेहमीच जनतेच्या प्रश्नासाठी भांडतात. सतेज सगळ्यांच्यापेक्षा फास्ट आहेत. जिल्हयात निश्चितपणे यापुढेही ते लोकांसाठी काम करत राहतील. अस मत आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केलं.
यावेळी आमदार प्रकाश आबीटकर यांनी बंटी पाटील आणि त्यांचे नियोजन उत्कृष्ट महाराष्ट्रात उल्लेखनीय प्रदर्शन, या प्रदर्शनाच्या मधमातून शेतकऱ्यांचा चांगला नेता अशी भविष्यात ओळख होईल. असा विश्वास आमदार आबीटकर यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार उल्हास पाटील यांनी आणि व्ही बी पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सांगली जिल्ह्यातील नागठाणे इथल्या मन्सूर यासिन मुल्ला यांच्या खिलार खोंड या बैलाला चॅम्पियन ऑफ दी शो चा मानकरी ठरल्याबद्दल त्यांना 11 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आलं.
यावेळी माजी आमदार संपतबापू पाटील, राजीव आवळे, सुरेश साळोखे, उपमहापौर अर्जुन माने, राजूबाब आवळे, अॅड.धनंजय पठाडे, आर के पोवार यांच्यासह निमंत्रित मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रदर्शनाला आज महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे विश्वजीत कदम व आ.सुजित मिणचेकर यांनी भेट दिली.यावेळी पीकस्पर्धा,पशुस्पर्धा,जनावरे स्पर्धा,फळस्पर्धांचा बक्षीस वितरण करण्यात आली.समारोपानंतर खा.राजू शेट्टी यांनी प्रदर्शन पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!