कोल्हापूरच्या खवय्येगिरीत भर; हनुमान पंचवटी शेट्टी-नायडू ग्रुपच्या व्यवस्थापनाखाली सुरू

 

कोल्हापूर: शेट्टी-नायडू ग्रुपच्या हनुमान फास्ट फूडच्या यशस्वितेनंतर, ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कच्या सफलतेनंतर याच ग्रुपच्या व्यवस्थापनाखाली रुईकर कॉलनी येथील हनुमान पंचवटी आता खवय्यांना तृप्त करण्यास सज्ज आहे.१९९१ पासून हनुमान फास्ट फूडच्या माध्यमातून आपले स्वतःचे स्थान निर्माण केलेल्या शेट्टी-नायडू ग्रुपने रुईकर कॉलनी येथील जुने पंचवटी गौरव आता आपल्या व्यवस्थापनाखाली नुकतेच सुरू केले आहे. त्याच्या नावात थोडासा बदल केला आहे. ते आता यापुढे हनुमान पंचवटी, एसी फॅमिली रेस्टॉरंट या नावाने ओळखले जाईल. येथे खवय्यांना साऊथ इंडियन, पंजाबी, महाराष्ट्रीयन, चायनीज मेन्यूच्या एकापेक्षा एक लज्जतदार डिशेस मिळतील. याचबरोबर बास्केट चाट, कटोरी चाट असे चाटचे विविध प्रकार, भेळपुरी, ज्यूस, पावभाजी, सुप्स, मिल्क शेक असे स्नॅक्स आणि फास्टफूडचे असंख्य स्वादिष्ट पदार्थ येथे चाखायला मिळतील.
हनुमान पंचवटी म्हणजे मित्रपरिवारासह लंच-डिनरचे फेवरिट डेस्टिनेशन. पार्टी असेल वा गेट-टुगेदर असेल तर पंचवटीच्या हॉलमध्ये आपणाला प्रायव्हसी तर मिळेलच शिवाय बेस्ट मेन्यूही आपण मागवू शकता. वाढदिवसाला तर फक्त आपली उपस्थितीच महत्त्वाची. बाकी सगळी तयारी येथे अगोदरपासून असेल. प्रसन्न वातावरण, हायजिनिक अँड टेस्टी फूड आणि विनम्र सेवा म्हणजेच हनुमान पंचवटी होय. एकाचवेळी १२५ खवय्यांची सोय ही पंचवटीची वेगळी खासियत.
या संदर्भात पुबालन नायडू म्हणाले की, ग्राहकाला तृप्त करण्याचा आम्हाला मिळालेला वसा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. हनुमान फास्ट फूडच्या माध्यमातून डोशाचे ११० प्रकार आम्ही देतो. यामध्ये उल्लेखनीय म्हणजे स्प्रिंग डोसा, चायनीज, मंच्युरी, तर इडलीमध्ये गुंटर इडली, इडली मंच्युरियन, कांचीवरम इडली असे १५ प्रकार आहेत. इतकेच नाही तर प्युअर साऊथ इंडियन थाळी सिस्टिम म्हणजे केळीच्या पानात जेवणाचा आस्वाद खवय्यांना लवकरच देणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!