छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभिकरण भूमिपूजन समारंभ उत्साहात संपन्न

 

कोल्हापूर  : छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे साडे तीनशे वर्षांपूर्वी मांडलेल्या विचारांची आजही अंमलबजावणी होत असून, छत्रपती शिवरायांच्या दिशादर्शक विचारांनी प्रेरित होऊन कोल्हापुरातील तरुणांनी समाजकार्यात सामील व्हावे, असे आवाहन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले. कोल्हापूर शहरातील अनेक लढ्यांचा आणि ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार बनलेल्या कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवछत्रपतींचे स्मारकाचे आज सुशोभीकरणाचा सोहळा अनेक सांकृतिक कार्यक्रमांनी भगव्या वातावरणात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौक हा कोल्हापूर वासीयांची अस्मिता असून, या ऐतिहासिक स्थळाच्या सुशोभिकरणाच्या कामासही तेवढ्याच दिमाखात सुरवात करण्यात आली. यासाठी  छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ३३ गड-किल्यांवरील माती, दगड व पाणी यांचे  संकलन करण्यात आले. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामधील पवित्र नद्यांचे पाणी व आणि कोल्हापूर शहरातील शाहूकालीन तालीम संस्थातील माती या पायाभरणी कार्यक्रमात वापरण्यात आली. सकाळी विविध गडकिल्यांवरील संकलित केलेलं पाणी, दगड, माती व तालीम संस्थांमधील माती तसेच पवित्र नद्यांमधील पाणी, कलशांची मिरवणूक – बिंदू चौक येथून सकाळी ९.०० वाजता पारंपारिक वाद्याच्या गजरात सुरवात करण्यात आली. यामध्ये ढोल-ताशा, हलगी, महिला लेझीम पथक आदींचा समावेश होता. यासह राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती ताराराणी महाराज,  छत्रपती शाहू महाराज, मावळे,अबदगिरी, पंत यांचे सजीव देखावे या मिरवणुकीचे खास आकर्षण होते. यावेळी शिवभक्तानी “जय भवानी, जय शिवाजी”, “छत्रपती शिवाजी महाराज कि जय” अशा घोषणांनी मिरवणूक परिसर दणाणून सोडला. ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येवून विसर्जित करण्यात   याठिकाणी भूमी पूजन विधीचा मान नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सेवा करणाऱ्या जोडप्यास देण्यात आला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास जलअभिषेक आणि दुग्धअभिषेक करण्यात आला. यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, महापौर सौ. हसीना फरास, आमदार राजेश क्षीरसागर आदी मान्यवरांच्या शुभहस्ते भूमी पूजन व पायाभरणी सोहळा संपन्न झाला. यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने शिवप्रेरणा मंत्राद्वारे उपस्थित शिवभक्तांना स्वराज्याची शपत देण्यात आली.  त्याचबरोबर शाहीर आझाद नायकवडी यांनी सादर केलेल्या पोवाड्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या स्थापनेपासूनच्या इतिहासाचा उलघडा करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारक उभारण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या स्वातंत्रसैनिका भागीरथी तांबट याचे वारसदार श्री. निशिकांत दत्तोबा तांबट आणि स्वातंत्र सैनिक शामराव पाटील यांचे चिरंजीव प्रकाश पाटील या वारसदारांचा छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यासह या कार्यक्रमामध्ये सहकार्य लाभलेल्या गेली अनेक वर्षे शिवस्मारकाचे संवर्धन करणारे छत्रपती शहाजी महाराज तरुण मंडळ अध्यक्ष उदय शिंदे, नियोजित शिवस्मारकाचे डिझाईन करणारे आर्किटेक्ट श्री. सुरज जाधव, गेली अनेक वर्षे शिवस्मारकाची नित्यनियमित पूजा करणारे श्री. पिंटू आनंदा पोवार, गेली अनेक वर्षे शिवस्मारकास नित्यनियमित दिवसातील पहिला हार अर्पण करणारे श्री.महमद पठाण (हारवाले), गडकिल्यांची जल व माती संकलन करणारे श्री. सुनील सूर्यवंशी – अध्यक्ष, राजा शिवछत्रपती परिवार, श्री. आशिष घोरपडे – उपाध्यक्ष, (श्री संताजी घोरपडे यांचे वंशज), श्री. दिगंबर साळोखे, पवित्र नद्यांचे पाणी आणणारे सिंचन विभागाचे अधिकारी, शिवध्येय मंत्र पठण करणारे श्री. सुरेश यादव, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,  पोवाडा सादर करणारे शाहीर आझाद नायकवडी, कार्यक्रमाची संकल्पना राबविणारे मानसिंग जाधव, प्रशांत पाटील, शोभायात्रेची संपूर्ण जबाबदारी सजीव चित्ररथ सहाय्यक श्री. राजन भिलारी, धनगरी ढोल – श्री. बाळासो मुंगसुळे(देश- विदेशामध्ये धनगरी ढोल वादन) महिला लेझीम पथक – श्री. सुनील करंबे,  हालगी/ ताशा पथक, मर्दानी खेळ पथक – श्री खंडोबा तालीम (श्री. विक्रम जरग), भारतवीर प्रतिष्ठान ढोल- ताशा पथकाचे अध्यक्ष- चेतन चौगले यांचा सत्कार करण्यात आला. यासह कोपर्डी हत्याकांडाचे यशस्वी तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी शशीराज पाटोळे आदींचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, गेले अनेक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाच्या सुशोभीकरणाचा विषय मार्गी लागला आहे. या सुशोभिकरणाकरिता सर्वांचा मान सन्मान ठेवून, डिझाईन करताना सर्वांच्या सूचना विचारात घेऊन, कोणालाही नाराज न करता हा आराखडा तयार करण्यात आला आहे. या सुशोभीकरणास एक अनन्यसाधारण महत्व असून, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ३३ गडकोट किल्यांवरील, कोल्हापूर जिल्ह्यातील पवित्र नद्यांचे पाणी आणि शहरातील शाहूकालीन तालीम संस्थांची माती आदीचा वापर करून या समारंभाला वेगळे वैभव प्राप्त केले आहे. हा कार्यक्रम सर्वांचा असल्याने राजकारण विरहित कार्यक्रम पार पडण्यावर सुशोभिकरण समितीने भर दिला आणि या कार्यक्रमाला वेगळे स्वरूप प्राप्त करून दिले. अनेक प्रकल्प आणले जातात त्याची उद्घाटने होतात पण काम पूर्ण होत नसल्याचे पहिले आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम अखंडित सुरु होऊन येत्या पाच महिन्यात पूर्ण होईल. याकरिता लागणारा सर्व निधी आपण यापूर्वीच महानगरपालिकेकडे हस्तांतरित केला आहे. सुशोभीकरणानंतर हे स्मारक देशातील एक नंबरचे स्मारक झाल्याचे आपणास दिसून येईल. सुशोभिकरणाच्या पुर्नात्वानंतर होलार उद्घाटन सोहळाही असाच लोकोत्सव करून साजरा करण्याची ग्वाही देत, पूर्णत्वानंतर नागरिकांनी या परिसराचे पावित्र राखण्याची जबाबदारी उचलून, शिवस्मारकाचा अवमान होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.यानंतर बोलताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी, हा दिवस ऐतिहासिक असून, आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या प्रयत्नाचे विशेष अभिनंदन केले. शिवस्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम कुठेही थांबणार नाही असे यथोचित नियोजन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सह समितीने केले आहे. सध्या शिवरायांच्या विचार आचरणात आणण्याची समाजास आवश्यकता असून, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या काळात घेतलेले निर्णय आजही लोकोपयोगी ठरत आहेत. असेच विचार प्रत्यक्ष कृतीतून प्रत्तेकाने आपल्या जीवनात अंमलात आणावेत. या थोरपुरुषांचे विचार जसे दिशादर्शक आहेत तसेच होणारे शिवस्मारक अनेकांचे दिशादर्शक असून, अनेक घटनांचे साक्षीदार आहेत. समस्त शहरवासियांचे हे स्फूर्तीस्थान आहे. या स्मारकाचा सन्मान राखण्याची जबाबदारी प्रत्तेक कोल्हापूर शहरवासीयांची असल्याचेही त्यांनी सांगितले.यानंतर बोलताना महापौर सौ. हसीना फरास यांनी, आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. कोल्हापूरची सून बनल्यापासून कोल्हापूरवासीयांनी महापौर बनवून मला सन्मान केला तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा पायाभरणी समारंभ आपल्या अध्यक्षतेखाली होणे हा मोठा माझा गौरव असल्याचे सांगत, आमदार राजेश क्षीरसागर यांचे यशस्वी प्रयत्नातून समिती लवकरच शहरवासियांना शिवस्मारकाचे आधुनिक रूप पहावयास मिळणार आहे. छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेवून सर्व कोल्हापूरवासियांनी एकत्र येवून असेच सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोशाध्यक्षा वैशाली क्षीरसागर,  उपमहापौर अर्जुन माने, स्थायी समिती सभापती संदीप नेजदार, परिवहन सभापती नियाज खान, नगरसेवक ईश्वर परमार, सौ. उमा बनछोडे, सौ. निलोफर आजरेकर, सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, सौ. सुरेखा शहा, माजी महापौर विलासराव सासणे, अॅड. महादेवराव आडगुळे, मारुतीराव कातवरे, आर. के. पोवार, नंदकुमार वळंजू, रविकिरण इंगवले, सिने दिग्दर्शक यशवंत भालकर, आदिल फरास, महेश उत्तुरे, सुरेश यादव, उदय भोसले, दिलीप देसाई, दीपक गौड, चंद्रकांत बराले, मधुकर नाझरे, चंद्रकांत यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!