काँग्रेसपक्ष अध्यक्षपदी राहूल गांधींची बिनविरोध निवड झाल्याबद्दल कॉग्रेस पक्षाच्यावतीने साखर वाटप

 

कोल्हापूर : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे आज राहूल गांधी यांनी स्वीकारल्यानंतर कोल्हापूरात त्यांचे जोरदार स्वागत झाले. या निमित्ताने काँग्रेसच्या वतीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकात साखर वाटप करण्यात आले. राहूल गांधी यांच्यामुळे पक्षात नवचैतन्य येईल असा विश्वास यावेळी आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे आज राहूल गांधी यांनी स्वीकारली. देशभरात या निमित्ताने आनंदाचे वातावरण आहे. कोल्हापूरातही काँग्रेसमध्ये याचे स्वागत होत आहे.
यावेळी गुलाबराव घोरपडे, सचिन चव्हाण, दुर्वास कदम, बाबासो चौगुले, नगरसेवक शारंगधर देशमुख, तौफिक मुल्लाणी, भुपाल शेटे, संजय मोहिते, सुभाष बुचडे, प्रतापसिंह जाधव, लाला भोसले, नगरसेविका दिपा मगदूम, उमा बनछोडे, सुरेखा शहा, वनिठा देठे, माजी उपमहापौर अर्जुन माने, पंचायत समिती सभापती प्रदिप झांबरे, राजू साबळे, उत्तम आंबवडेकर, गणी आजरेकर तसेच महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!