
रॉयल रायडर्स रेसिंगचा थरार शुक्रवारपासून
कोल्हापूर: डर्ट ट्रॅक,लेडीज क्लाज डर्ट ट्रॅक,बॉण्ड ऑफ ब्रदर, फिगर ऑफ 8,कॅरी द फ्युरी,टग ऑफ वार,स्लो रेस अश्या गटात राष्ट्रीय पातळीवर पार पडणार आहेत. तसेच कोल्हापुरात कधीही न पाहिलेल्या टू व्हीलर, फोर व्हीलर चे ब्रॅन्डचे स्टॉल्स इथे असणार आहेत.कोल्हापूरचे रायडर्स यात सहभागी होत आहेत. तरी
रॉयल रायडर्स आणि मोहितेज रेसिंग अकादमी यांच्या वतीने येत्या 22 ते 24 डिसेंबर या कालावधीत’रॉयल रोडीयो 2017 चे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये संपूर्ण देशातून 150 रायडर्स सहभागी होणार आहेत. अशी माहिती रॉयल रायडर्सचे अध्यक्ष जयदीप पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.या तीन दिवसात बाईक्स च्या विविध स्पर्धा तसेच बुलेट रायडर्सच्या स्पर्धा हे या रायडर्स शो चे मुख्य आकर्षण असणार आहे.
राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करू इच्छिणाऱ्या रायडर्ससाठी ही सुवर्णसंधी आहे. नवनवीन आव्हानांना सामोरे जाताना इथे रायडर्स दिसणार आहेत. या इव्हेंटसाठी विशिष्ठ प्रकारचा ट्रॅक तयार करण्यात आला आहे. तरी बाईक प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला चंदन मिरजकर, नंदू खुपेरकर,संतोष शर्मा, अशोक देसाई, सुदर्शन खोत,संग्राम भोसले अक्षय जाधव,संदीप माने आदी उपस्थित होते.
Leave a Reply