
कोल्हापूर: रॉयल रायडर्स आणि मोहितेज रेसिंग अकादमी यांच्या वतीने येत्या 22 ते 24 डिसेंबर या कालावधीत’रॉयल रोडीयो 2017 चे आयोजन करण्यात आले आहे. याचे आज मोहिते रेसिंग अकादमीचे प्रमुख शिवाजीराव मोहिते, मॅक लुब्रीकंटचे शशांक शर्मा, अनंत तीके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी रॉयल रायडर्सचे अध्यक्ष जयदीप पोवार, संतोष शर्मा,पार्षद वायचळ,मानसिंग पाटील,योगेश पाटील, संदीप देसाई,अनिल तनवाणी,ऐय्याज मुल्ला, राजेश वोरा आणि सदस्य उपस्थित होते.
यामध्ये संपूर्ण देशातून 150 रायडर्स या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. तीन दिवसात बाईक्स च्या विविध स्पर्धा तसेच बुलेट रायडर्स च्या स्पर्धा हे या रायडर्स शो चे मुख्य आकर्षण असणार आहे. डर्ट ट्रॅक,लेडीज क्लाज डर्ट ट्रॅक,बॉण्ड ऑफ ब्रदर, फिगर ऑफ 8,कॅरी द फ्युरी,टग ऑफ वार,स्लो रेस अश्या गटात राष्ट्रीय पातळीवर पार पडणार आहेत. तसेच कोल्हापुरात कधीही न पाहिलेल्या टू व्हीलर, फोर व्हीलर चे ब्रॅन्डचे स्टॉल्स इथे असणार आहेत.कोल्हापूरचे यात 50 हुन अधिक रायडर्स सहभागी आहेत. आहे.आज स्लो बुलेट रेस आणि फिगर ऑफ 8 या स्पर्धा पार पडल्या.बाईक प्रेमींनी स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
Leave a Reply