
मराठी चित्रपटसृष्टीत आज विविधांगी विषयांवर आधारित चित्रपटबनण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. प्रत्येक दिग्दर्शक आपलं वेगळेपण जपत कथानकाची निवड करीत असून तितक्याच अनोख्याशैलीत सादरीकरण करीत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. काही चित्रपट शीर्षकापासूनच लक्ष वेधून घेण्याचं काम करतात. नुकतेचचित्रीकरणाला सुरूवात झालेला ‘मिसेस देशमुख’ हा मराठी चित्रपटही याच पठडीतील आहे. सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पहिले शेडयुल कराडजवळील कासेगाव येथे संजय देशमुख यांच्या देशमुख बंगला व वाटेगाव परिसरात सुरू आहे. लग्नसंस्था आणि वधू-वरांमधील नातेसंबंध हा विषय मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ऐरणीवर आहे. वर्तनमानकाळात सतावणाऱ्या समस्या पडद्यावरवास्तवतेची सांगड घालून सादर करण्यात येत असल्याने अशा चित्रपटांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. आराधना फिल्म्स क्रिएशन्स व ए.आर.क्रिएशन निर्मिती असलेला ‘मिसेस देशमुख’ हा चित्रपटही लग्नआणि त्याच्याशी संबंधित घटनांशी निगडीत आहे. रागिनी कडणे आणिवैशाली जाधव या चित्रपटाच्या निर्मात्या असून राजू जाधव हे याचित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. राजू जाधव, राजेन्द्र कुबल आणि सादिकखान सह निर्मात्याच्या भूमिकेत ‘मिसेस देशमुख’ या चित्रपटाच्यानिर्मिती प्रक्रियेत मोलाचं सहकार्य करीत आहेत, तर अरविंद चांडक, राहुल बूब आणि विकास मुंदडा या चित्रपटाचे सहाय्यक निर्माते आहेत.राजन अग्रवाल यांनी या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे.
भारतीय संस्कृतीतील लग्न म्हणजे जणू एक सोहळाच असतो. वधू-वराला शोधण्यापासून त्यांची पसंती होईपर्यंत आणि नंतर साखरपुडा,हळदी समारंभापासून थेट लग्नापर्यंत या सोहळयात कुटुंबातील सर्वसदस्य सहभागी होत असतात. याच कारणामुळे लग्न हा जरी दोनमनांच्या मिलनाचा सोहळा असला तरी त्याहीपेक्षा दोन कुटुंबांना जोडणारा दुवाही असल्याचं नेहमीच म्हटलं जातं. ‘मिसेस देशमुख’ याचित्रपटातही अशाच एका कुटुंबाची, त्यातील परस्पर भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची, वधू आणि वराची तसंच लग्नाची गोष्ट पाहायला मिळणारआहे. हा चित्रपट वर्तमान परिस्थितीवर मिश्किलपणे भाष्य करीततरूणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचंच लक्ष वेधून घेणारा असल्याचं मतदिग्दर्शक राजू जाधव व्यक्त करतात. दिग्दर्शकांच्या म्हणण्यानुसार हा चित्रपट जरी लग्नसंस्थेवर आधारित असला तरी आजवर कधीही समोरन आलेले लहान सहान पैलू यात अत्यंत बारकाईने, पण अतिशयठळकपणे मांडण्यात आले आहेत. प्रत्येक व्यक्तिरेखेतील विविध पदर, तसंच कथानकातील प्रसंग प्रत्येकाला आपल्याच आयुष्यातीलअसल्यासारखे वाटतील आणि त्यामुळेच प्रत्येक प्रेक्षक या चित्रपटाशी स्वतःला रिलेट करेल. एक अनोख्या कथानकाला अभिनय, संगीतआणि उत्तम सादरीकरणाची जोड देत लक्षवेधी तसच मनालाभिडणारी कलाकृती बनवण्याचा आपला मानस असल्याचंही दिग्दर्शक राजू जाधव म्हणाले.
यतीन कार्येकर, विजय पाटकर, कमलेश सावंत, भारत गणेशपुरे,राजश्री निकम, नयनाआपटे, माधव अभ्यंकर, मिलिंद दास्ताने, दिपाली साठे,विराज डागा आदि कलाकारया चित्रपटात नानारंगी व्यक्तिरेखा साकारित आहेत. सादिक खान याचित्रपटाचे छायालेखक आहेत. प्रशांत कडणे आणि पूजा कुबल यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. प्रकाश कदम यांनीया चित्रपटासाठी प्रसंगानुरूप संवादलेखन केलं आहे. अश्विन भंडारे यांनी गीतलेखन केलं असून, अमेया नरे आणि साजन पटेल यांचं संगीतव पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभणार आहे. मनिष चौधरी याचित्रपटाचे कला दिगदर्शक आहेत, तर अभिजित बारामती, शिरीष देवरूखकर, सतीश हिर्लेकर, नियाज चौगुले आणि अजय अंजारानिर्मिती व्यवस्थापक आहेत. मनिष चौधरी, मयुर पंडित, वृंदा राजमणी आणि ललित पिंपळघरे ‘मिसेस देशमुख’चे सहाय्यक दिग्दर्शक आहेत.फकिरा साठे,रमेश साठे,प्रसाद साठे,सचिन मोरे,सरपंच सुरेश साठे आणि कासेगाव,वाटेगाव पोलिस व ग्रामस्थांच्यां सहकार्याने चित्रिकरण जोरात सुरू आहे.
Leave a Reply