
कोल्हापूर: कोल्हापुरात राजारामपुरी येथील ‘टेंडर टच फाउंडेशन’ च्यावतीने लहान मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या डे केअर सेंटरचे उद्घाटन आज आ.डॉ. सुजित मिणचेकर भागीरथी महिला संस्थेच्या सौ.अध्यक्षा अरुंधती महाडिक टेंडर फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन राजशेखर ,उपाध्यक्षा सौ. स्मिता सावंत मांडरे आणि कै. राजशेखर यांच्या पत्नी श्रीमती माधवी राजशेखर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.प्रसिध्द अभिनेते कै. राजशेखर यांच्या १२ व्या स्मृती दिना निमित्त आज हा कार्यक्रम संपन्न झाला. समाजात आज स्त्रिया स्वतःला सिद्ध करण्यासाठी बाहेर पडत आहेत पण घर मुले यांच्याकडेही त्यांचा ओढा असतो. आपल्या मुलांची योग्य काळजी सुरक्षितता याचा विचार त्यांना भेडसावत असतो. त्यामुळे अशाप्रकारच्या डे केअर सेंटरची आवश्यकता आहे असे उदगार सौ. अरुंधती महाडिक यांनी काढले.ही संकल्पना लवकरच समाजात रुजेल. अश्या प्रकारच्या सेंटरमुळे पालक आपल्या पाल्यांच्या बाबतीत निर्धास्त राहतील. पालकांनी ठेवलेल्या विश्वासाला हे सेंटर नक्कीच पात्र ठरेल अशी अपेक्षा आ. डॉ.सुजित मिणचेकर यांनी व्यक्त केली.
या सेंटरमध्ये ‘एक वर्षापासून ते पुढे’ या वयोगटातील मुलांचा सांभाळ केला जाणार आहे. स्वच्छता,आहार तज्ञांकडून योग्य आहार, पाल्याच्या शारीरिक बौद्धिक विकासासाठी लागणाऱ्या आवश्यक सोयीसुविधा, मानसिक दृष्ट्या पाल प्रगल्भ व्हावे यासाठी बाल मानसोपचार तज्ञांची नेमणूक, प्रशिक्षित शिक्षकांकडून मुलांना मार्गदर्शन, आरोग्य तपासणी,संस्कार वर्ग, योगाचे प्रशिक्षण, सूर्यनमस्कार, शिस्तीचे धडे ही या सेंटरमध्ये दिले जाणार आहेत. तसेच पाल्यातील अंगीकृत गुण ओळखून पालकांना याबद्दल मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. पाल्याच्या सुरक्षिततेची सर्वतोपरी काळजी येथे घेतली जाणार आहे.यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा ऍक्सेस पालकांच्या मोबाईलवर देण्यात येणार आहे.एकूणच आपले मूल एकाकी न बनता संस्कारित, सुरक्षित, मायेच्या छायेखाली रहावे यासाठी हे सेंटर सतत प्रयत्नशील राहणार आहे.असे फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन राजशेखर आणि उपाध्यक्षा सौ.स्मिता सावंत यांनी सांगितले. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील एक भाग सामाजिक उपक्रमांसाठी दिला जाणार आहे.गेले २० वर्षे मातोश्री वृद्धाश्रमाच्या माध्यमातून आपण समाजाचे देणे लागतो ही बांधिलकी राजशेखर कुटुंबियांनी नेहमीच जोपासली आहे.
कार्यक्रमास सदस्या डॉ. गीता पिल्लई,मुकुंद कपडेकर,मधुकर नाझरे,उल्का काकडे,राहुल राजशेखर,मिलिंद धोंड,डॉ. मिनल मुल्हेरकर, ऍड इंद्रजीत चव्हाण,दुर्गेश लिंग्रस,किशोर घाटगे,श्रीकांत पोतनीस,पूनम सुतार,संयोगीता मांडरे, सुनिता मांडरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply